कदाचित हेच आहे प्रेम, अभिषेक दळवी [short books to read TXT] 📗
- Author: अभिषेक दळवी
Book online «कदाचित हेच आहे प्रेम, अभिषेक दळवी [short books to read TXT] 📗». Author अभिषेक दळवी
" याला म्हणतात आले घोड्यावरून गेले गाढवावरून " विकीने कमेंट केली.
त्यानंतर एक मुलगी आली ती इतक्या फास्ट बोलत होती ना की काहीच कळत नव्हतं .
" ही इतक्या फास्ट बोलतेय ना जस काही कॉलेजमधे बॉम्ब ठेवलाय आणि तो फुटायच्या आत हिला कॉलेजमधून बाहेर पडायचय ." विकीने पुन्हा कमेंट केली.
नंतर एक मुलगा आला तो इतक्या हळु आवाजात बोलत होता की आम्हालाच काय त्याच्या हातातल्या माइकपर्यंतही त्याचा आवाज पोहचत नव्हता .
" ह्याला म्हणतात डोकं.......तो काहीच बोलत नाहीये फक्त तोंड हलवतोय आम्ही शाळेत असताना असच करायचो. कोणालाही अजिबात संशय यायचा नाही . " ही कमेंट ही विकीनेच केली.
त्यानंतर एक मुलगा आला आणि दोन मिनिट माईक पकडून तसाच उभा राहिला .
त्याला काय बोलाव काहीच कळत नव्हत शेवटी कोणती तरी पंचतंत्राची गोष्ट सांगून तो निघून गेला .
" ह्याला म्हणतात फालतूगिरी. बोलायला सांगीतलय ना म्हणून काहीही बोलायचं .
" आतासुद्धा विकीनेच कमेंट केली होती . त्याच्या या कमेंट्स ऐकून मी फार हसत होतो .
नंतर एक मुलगी आली तिचा ऍटीट्यूड पाहून वाटल काहीतरी चांगल बोलेल पण तिचा विषय ऐकूनच आमचा मूड गेला .विषय होता ' फेमीनिजम ' .सर्वात आधी देवाने तिला मुलगी म्हणून जन्म दिला याबद्दल तिने देवाचे आभार मानले .त्या नंतर तिने बोलायला सुरुवात केली ती थांबतच नव्हती .
" तुला माहितीये अभी, ब्लॅक पँथर हा जगातला सर्वात दुर्मिळ प्राणी आहे पण त्याला जितका स्वतःवर अभिमान नसेल ना तितका हिला आहे .जस काय ही एकच मुलगी म्हणून जन्माला आलीय बाकी सगळ्या आकाशातून पडल्या आहेत ." ही कमेंट सुद्धा विकीचीच होती .
ती मुलगी आता स्त्री अत्याचारावर बोलायला लागली आणि ती अशी बोलत होती की काही क्षणांसाठी मला अस वाटू लागलं या जगातला प्रत्येक पुरुष स्त्रियांवर अत्याचार करायला जन्माला आला आहे आणि अत्याचार करण्याशिवाय पुरुषांकडे अजून काही कामधंदेच नाहीत .पाच मिनिटांचा टाईम दिला होता पण दहा मिनिट झाली तरी तिची बडबड चालूच होती. तिच्यासारख्याच काही मूली सोडल्या तर बाकी सगळे जण बोर झाले होते पण ती काही हातातला माईक सोडत नव्हती .शेवटी तिला थांबवायला विकीलाच पुढे यावं लागलं .ती बोलत असताना त्याने मधुनच टाळ्या वाजवायला सुरुवात केली .आम्ही शाळेत असताना आम्हाला २६ जानेवारीला भर उन्हात मैदानात बसवून शाळेने बोलावलेले नेते भाषण द्यायचे .त्यावेळी जेव्हा आम्ही बोर व्हायचो तेव्हा असच टाळ्या वाजवून आम्ही त्यांना डिस्टर्ब करायचो .आताही विकी दर एक मिनिटांनी टाळ्या वाजवत होता आणि बाकीची सर्व मूलही त्याला साथ देत होती .जी मुलगी मघास पासून बोलत होती हा सर्व गोंधळ पाहून तिचा चेहरा रागाने लालबूंद झाला होता .शेवटी
" स्त्रियांचा आदर करा " अशी आरोळी ठोकून तिने तिची बडबड संपवली .
त्यानंतर माझ्याच पुढच्या रो मधे एक मुलगी बसली होती .ती उठून स्टेजकडे जाऊ लागली .मी तिचा चेहरा पाहिला नव्हता पण मला अस वाटत होत की मी तिला ओळखतोय किंवा मी तिला पाहीलयं .ती स्टेजवर गेली माईक घेतला आणि आमच्यासमोर वळली .तिचा चेहरा पाहून मी आपोआपच खुर्चीत ताठ बसलो , माझ्या हृदयाची स्पंदन आपोआप वाढू लागली ही तीच मुलगी होती जिला मी कॉलेजच्या पहिल्या दिवशी पाहील होत .सफेद चूड़ीदार , मोकळे सोडलेले केस , लाल लिपस्टीक लावलेल्या ओठांवर असलेल स्मितहास्य , कानाच्या मुलायम पाळीवर अडकवलेले झूमके. तिला पाहून मला सर्वात पुढच्या रो मधे जाऊन बसायची फार इच्छा होत होती पण पुन्हा मघाससारख बाहेर काढण्याची भीती होती म्हणून नाईलाजाने मी तिथेच बसून राहिलो .तिने आपल्या नाजुक बोटांनी माईकवर टकटक केली आणि बोलू लागली .ती बोलू लागल्यावर मी लक्ष देऊन तिचा प्रत्येक शब्द ऐकू लागलो . तिचा आवाज मी फार दिवसांनंतर ऐकत होतो .अस वाटत होत की तिने फक्त बोलत राहाव आणि मी ते ऐकत तिला पाहत राहाव .ती कोणत्या तरी मुलीची स्टोरी सांगत होती जी जन्मापासून कधीच तिच्या मनासारख आयुष्य जगली नव्हती , सतत तिच्यावर तिच्या वडिलांची मत लादली गेली इतकच काय तिला तिचा जीवनाचा जोडीदार शोधायचही स्वातंत्र्य नव्हत .तिची स्टोरी इतकी इमोशनल होती की काहीवेळापूर्वी गडबड गोंधळ करणारी मुलं आता शांत बसली होती. अगदी विकीसुद्धा लक्ष देऊन तीच बोलणं ऐकत होता. सलग चार मिनिट ती फार भरभरून बोलत होती त्या नंतर तिचा आवाज रडवेला झाला .तिच्या अावाजातला हा बदल मला स्पष्टपणे जाणवला .मी नीट निरखून तिच्याकडे पाहू लागलो तिच्या डोळ्यांतून हळुहळु अश्रू ओघळू लागले तिची अशी अवस्था पाहून माझ्या मनाची घालमेल वाढू लागली .अचानक तिने माईक ठेवला आणि रडतच स्टेजवरून खाली उतरली .माझ्या पुढच्या रो मध्ये बसलेल्या तिच्या मैत्रिणी उठून तिच्याकडे जाऊ लागल्या .तिचा रडवेला चेहरा पाहून मला राहवल नाही .मी ही त्या मुलींमागोमाग तिच्या जवळ आलो .तिच्या मैत्रिणी तिच्या बाजूला घोळका करून उभ्या होत्या .मी माझ्या बॅगेतली पाण्याची बॉटल काढली आणि तिच्या समोर धरली .तिने ती हातात पकडली आणि एकदा माझ्याकडे पाहिलं .डोळे पाणावले होते ,नाक टोमॅटोसारख लाल झाल होत पण खरच रडतानाही ती फार सुंदर दिसत होती .माझ्या हातून बाटली घेताना तिच्या बोटांचा स्पर्श माझ्या हाताच्या बोटांना झाला तेव्हा माझ्या बोटांपासून पूर्ण शरीरात एक करंट वाहत गेला आहे अस मला जाणवलं .त्या दोन क्षणांसाठी मला पूर्ण जगाचा विसर पडला .अस वाटत होत तिथे फक्त ती आणि मी आहे , आम्हा दोघांशिवाय पूर्ण जग स्तब्ध झालय .मी फक्त तिच्याकडे एकटक पाहत होतो .तिने पाणी पिऊन माझी बॉटल मला परत दिली .ती घेताना मी तिला एक स्माईल देण्याचा प्रयत्न केला पण तितक्यात माझ्या पाठीवर थाप पडली .मी मागे वळून पाहिल मागे एक माणूस उभा होता हा तोच माणूस होता ज्याने थोड्या वेळा पूर्वी विकीला आणि मला हॉलबाहेर काढल होत .आता पुन्हा त्यानेच मला बाहेर काढल मग विकीलाही बाहेर यावं लागलं .विकी माझ्यावर भडकला होता .
" तुला काय गरज होती हिरो बनायची .आपल्या क्लासमधल्या कोणत्या मुलींनी साध पेन जरी मागितलं तर देत नाहीस आणि तिच्यासाठी बॉटल घेऊन धावलास ."
विकी मला काहीही बोलला तरी मला त्याच वाईट वाटत नव्हत .स्मिता स्टेजवर गेल्यापासून ते आम्हाला बाहेर काढेपर्यंतची सहा मिनिटांचा वेळ कसा होऊन गेला मला कळलं ही नाही . मधल्या काळात मी स्मिताला पूर्णपणे विसरून गेलो होतो पण आताची ही सहा मिनिट कायम माझ्या लक्षात राहणार होती .
स्मिता ......
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील फार महत्वाचा दिवस होता .आयुष्यात पहिल्यांदा मी इतक फ्रँकली बोलले होते .मी जी स्टोरी सांगितली होती ती माझीच होती . लहानपणापासून मनात जे दुःख साचलं होत ते आज मी बोलून टाकलं आणि सर्वांना ते आवडलही .तो टास्कही मीच जिंकला होता .
आज आमच्या सेमिनार हॉलमधे काही मुल घुसली होती .आमच्याच मागच्या रो मधे बसली होती .प्रत्येक परफॉर्मरवर काही ना काही तरी कमेंट पास करत होती आणि हसत होती .मला त्यांचा फार राग आला होता .पण नंतर जेव्हा मी स्टेजवरून उतरले तेव्हा त्यातलाच एक माझ्यासाठी पाणी घेऊन आला तो मला बाकीच्यांपेक्षा वेगळा वाटला .मला जेव्हा रडू आल तेव्हा माझ्याच क्लासमधली काही मुल माझ्यावर हसत होती मी पाहिलं होतं आणि तो मुलगा मला ओळखत ही नव्हता तरी माझ्यासाठी पुढे आला .मी जेव्हा त्याला पाहील तेव्हा त्याच्या डोळ्यात मला एक आपुलकीची भावना दिसली .अस म्हणतात मुलींचा सीक्स्थ सेन्स अॅक्टिव्ह असतो त्यामुळेही जाणवलं असेल किंवा कदाचित भासही असेल पण काही क्षणांपुरती त्या मुलाबद्दल माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली .
हा तोच मुलगा होता जो कॉलेजच्या पहिल्या दिवशी आमच्या क्लासमध्ये येऊन बसला होता .त्याला मी आणखी एकदा पाहिल होत कदाचित दोन महिन्यांपूर्वी मी आणि प्रिया त्या दिवशी लायब्ररीत बसलो होतो .संध्याकाळी निघताना जरा उशीरच झाला .घरी जाण्यासाठी आम्ही निघालो तेव्हा दोन मुल पायऱ्यांवरून धावत खाली गेली त्यात हा ही होता .त्यावेळी माझ्या बॉटलमधल पाणी संपल होत त्यात प्रियालाही तहान लागली होती .आमच्या वॉशरूमसमोरचा कूलर बंद होता म्हणून आम्ही वरच्या फ्लोअरवर मुलांच्या कूलरजवळ पाणी भरायला गेलो तेव्हा आम्ही पाहिलं, मुलांच्या वॉशरूममध्ये कोणी तरी अडकल आहे .त्या वॉशरूमच्या दरवाजावर आतून थापा बसत होत्या दरवाजाला बाहेर कड़ी होती .मी ती कडी उघडायला जाणार तितक्यात प्रियाने मला थांबवल .
" दरवाजा उघडू नकोस .आत जो कोणी आहे तो आपल्यावरच आरोप करेल की आपणच दरवाजाला कडी लावली ."
" प्रिया म्हणाली .
" अग पण आत जे कोणी आहे त्याला बाहेर काढायला हव नाहीतर रात्रभर आतच अडकून बसेल ." मी म्हणाले .
" एक काम करूया वॉचमनला सांगूया ." .
मला घेऊन ती कॉलेजच्या गेटजवळ आली .आम्ही वॉचमनला सांगितलही पण त्याने ऐकलं की नाही माहीत नाही .कारण तो मोबाईलवर बोलत होता .
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला कळल की एका प्रोफ़ेसरला रात्रभर कोणी तरी वॉशरूममधे कोंडून ठेवलं होतं .दुसऱ्या दिवशी चौकशी झाली मला संशय आला होता की त्याच दोन मुलांनी कोंडल असणार जी दोन मुल आम्हाला दिसली होती .चौकशी झाली तेव्हा मी त्या मुलांबद्दल सांगणारच होते पण प्रिया म्हणाली,
" काही गरज नाही त्या अडकलेल्या प्रोफ़ेसरबद्दल इतकी दया दाखवायची .हा तोच आहे जो आपल्याला लायब्ररीच्या बाहेर ओरडला होता ."
आमच्या लायब्ररी बाहेर एक झेरॉक्सच दुकान होत तिथे नेहमीच गर्दी असायची . एकदा कॉलेज सुटल्यावर आम्ही मुली तिथे झेरॉक्स घेण्यासाठी उभे होतो .त्याच फ्लोरवर शेवटचा क्लास थर्ड यीअर इंजिनियरिंगचा होता .तिथून तो प्रोफ़ेसर आला आणि आम्हाला ओरडायला लागला .
" इथे उभ्या राहून गोंधळ काय करताय लायब्ररीत जाऊन अभ्यास नाही करता येत ??"
" सर, कालच एग्जाम संपली आहे .लायब्ररीला पण थोडा आराम द्यायला हवा ना ." मोनिका बोलली .मोनिका तशी स्पष्ट बोलणारी मुलगी होती तिला कोणाशीच काहीही बोलताना भीती वैगरे नाही वाटायची .
" आई बापाने आराम करायला कॉलेजला पाठवलय का ??" तो प्रोफ़ेसर मोनिकाला म्हणाला .
आम्हाला तेव्हा खरच फार राग आला .एक तर तो इंजिनियरिंगचा प्रोफ़ेसर होता .आमच्याशी त्याचा काही संबंध नव्हता त्यात आमच्या आई वडिलांना मधे घ्यायची काय गरज होती ? म्हणून आमच्या ग्रूपमधल्या सर्व मुली त्या वर नाराज होत्या .जेव्हा तो रात्रभर वॉशरूममधे अडकला होता हे कळल तेव्हा आम्ही हसून हसून दमलो .
माझी आई मला नेहमी सांगायची
" जो आपल्या गुरुंना दुखावतो तो आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही ."
तिने बी.एड़ केल होत आणि तिलाही शिक्षक व्हायच होत म्हणून ती अस म्हणायची ही गोष्ट नंतर मला कळली . तस पाहायला गेल तर शिक्षकांच माझ्या आयुष्यात फार महत्व होत .मी लहान असताना फारच भित्री होते तेव्हा आमच्या परांजपे मॅडम मला सर्वांसमोर उभ करून कविता किंवा एखादा निबंध बोलून दाखवायला सांगायच्या .कॉलेजला गेल्यावर एक दरेकर नावाच्या मॅडम होत्या त्यांच्यामुळेच मला बुक्स वाचायची सवय लागली .
पण जशी चांगली लोक असतात तशी वाईट लोकसुद्धा असतात .आमच्या गावच्या शाळेला सरकारकडून गरीब मुलांसाठी धान्य मिळायच .एक नाडकर्णी नावाचा माणूस त्या शाळेचा व्हाईस प्रिन्सिपल होता तो ते धान्य चोरून बाहेर विकायचा .गावातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला वाड्याच्या नोकरांकडून कळायच्या .एक दिवस नाडकर्णीच्या घराला आग लागली पण मला त्याच्याबद्दल अजिबात सहानुभूती जाणवली नाही उलट आनंद झाला की त्याला त्याच्या कर्माची फळं मिळाली . तसच काहीसा आनंद तो प्रोफ़ेसर वॉशरूममधे अडकल्यावर झाला होता .म्हणूनच तो मुलगा माझ्या चांगला लक्षात राहिला होता .
सेकेंड सेमिस्टर सुरू होऊन फार दिवस झाले होते .कॉलेजमध्ये माझा चांगला ग्रूप जमला होता .कॉलेजमध्ये माझ्या मैत्रीणी होत्या त्या सहज लेक्चर बंक करायच्या .मी कधीच अस केल नाही कारण मी जरा जास्तच डिसेंट होते .काही वेळेला अस व्हायचं अर्ध्यापेक्षा जास्त क्लास मास बंक करायचा पण मी आणि काही मुली आम्ही क्लासमध्येच बसलो असायचो .आता इतक्या कमी मुलांसाठी कोणी लेक्चर तर घेणार नाही मग तो लेक्चर ऑफच जायचा .मग मीही विचार केला जर लेक्चरला बसूनही लेक्चर ऑफ जात असेल तर मग बंक केल तर काय वाईट आहे आणि असंही माझा रिझल्ट टॉप टेनमध्ये असायचा .ज्युनियर कॉलेजमधेही माझा असाच रँँक असायचा पण या रँँकचा माझा भविष्यात काही उपयोग नव्हता आणि मामानेही मला कॉलेजलाईफ एंजॉय करायला सांगितल होत .मग मी ही विचार केला मी माझी ही आदर्श विद्यार्थीनीची काही तत्व बाजूला ठेवली तर काय बिघडलं .म्हणून मी ही कधी कधी बंक करायला सुरुवात केली .आम्हाला मॅथ्यसला सावंत नावाचे सर होते ते कधी कधी लेक्चर संपला तरी शिकवत राहायचे .एकदा लंचटाइमच्या आधी त्यांचा लेक्चर होता .लेक्चर संपून दहा मिनिट झाली तरी ते शिकवतच होते. आम्हाला फार भूक लागली होती .माझ्या पुढे सोनाली नावाची मुलगी होती तिने डब्यात गुलाबजाम आणले होते तिने दोन घेऊन डबा मागे पास केला .सावंत सर काही लिहायला जेव्हा फळ्याकडे वळायचे तेव्हा माझ्या ग्रुपमधल्या मुली एक एक करून गुलाबजाम खायच्या .गुलाबजाम माझा वीक पॉईंट मला ही खायची फार इच्छा होती पण हिम्मत होत नव्हती .आमच्या ग्रूपमधल्या सगळ्या मुलींनी गुलाबजाम खाल्ले .आता फक्त शेवटचे दोन उरले होते माझा जीव कासावीस होऊ लागला .सरांची आमच्याकडे पाठ आहे हे पाहून मी पटकन ते दोन गुलाबजाम उचलले आणि तोंडात टाकले तेव्हाच सर वळले आणि त्यांनी
Comments (0)