readenglishbook.com » Romance » कदाचित हेच आहे प्रेम, अभिषेक दळवी [short books to read TXT] 📗

Book online «कदाचित हेच आहे प्रेम, अभिषेक दळवी [short books to read TXT] 📗». Author अभिषेक दळवी



1 2 3 4 5 6 7 8 9 10
Go to page:
त्याच मुलीशी लग्न करायचस जिच्याशी मी ठरवेन .दुसऱ्या कोणत्या मुलीचा तू विचारही करायचा नाही .अस केलस तर मी मानेन तुला बापाची कदर आहे " पप्पा म्हणाले .

" ठीक आहे ." मी थोडा विचार करून म्हणालो .

थोडफार जेवुन मी बाहेर आलो .रात्रीचे साड़ेनऊ वाजले होते .आमच्या बंगल्यापासून काही अंतरावर आमच्या कॉलनीच गार्डन होत .मी गेट उघडून आत आलो .गार्डनमधल्या छोट्या छोट्या लँपचा प्रकाश सगळीकडे पसरला होता , चारही बाजूला नीरव शांतता पसरली होती , झुडुपांमधून रातकिड्यांच्या किरकिर ऐकू येत होती , गार्डनच्या मधोमध शंकराच्या पिंडीकेच्या आकाराचा फाउंटन होता .नऊ फूट उंच पिंडीका आणि त्यावरून उडणारे पाण्याचे तुषार , लँपच्या मंद प्रकाशात ते फार सुंदर दिसत होते .मी बाजूच्या झोपळ्यावर जाऊन बसलो .तो मोठा झोपाळा कर्रकर्र आवाज करत पुढे मागे झोके घेऊ लागला .माझी ही लहानपणापासूनची सवय होती मी रूसलो , बिनसलो किंवा दुःखी झालो तर असच या झोपाळ्यावर येऊन बसायचो .

आताही माझ्या मनात तेच विचार चालू होते .ज्याबद्दल मघाशी पप्पा माझ्याशी बोलले होते .दादाच वागणं पूर्णपणे चुकीच आहे अस मी मानत नव्हतो त्याचा रस्ता चुकला असेलही कदाचित पण ध्येय चुकीच नव्हत .संदेशदादाच्या आयुष्याचा प्रश्न होता एका मुलीवर प्रेम असताना दुसऱ्याच मुलीशी लग्न करून तो सुखी झाला असता की नाही हे सांगण अवघड आहे कदाचित त्याच्या दृष्टिने त्याचा निर्णय योग्य असेलही .पण त्याच्या आणि दादाच्या अशा वागण्याने पप्पांना फार त्रास झाला होता .आज पहिल्यांदा मी त्यांना इतक उदास पहात होतो .मी आतापर्यंत पप्पांची प्रत्येक गोष्ट निमुटपणे ऐकत आलो होतो आणि आता जेव्हा त्यांना खरच गरज होती तेव्हा मी त्यांना दिलेला शब्द मला पाळावाच लागणार होता .काही वेळ तिथे बसून मी घरी परतलो .पण नंतरचे दोनदिवस मला सतत तिची आठवण येत होती .

हो तीच " स्मिता जहांगीरदार " मम्मी नेहमी म्हणायची .

" एखादी गोष्ट जसजशी आपल्यापासून दूर जाऊ लागते तेव्हा त्या गोष्टीकडे आपली ओढ वाढू लागते."

माझ्या बाबतीत ही असच होत असाव .मी स्मिताला जेव्हा त्या सेमिनार हॉलमध्ये सर्वांसमोर स्पष्टपणे न घाबरता स्वतःच मत मांडताना पाहिल होत तेव्हापासून तिच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला होता .मी फार इंप्रेस झालो होतो .ती मला फार आवडू लागली होती .नेहमी रात्री झोपताना आणि सकाळी उठताना मनात फक्त तीचेच विचार असायचे .तिचे लेक्चर कधी कधी लवकर संपायचे तेव्हा ती तिच्या मैत्रिणींसोबत कँटीनमधे येऊन बसायची .कँटीनच्या बाजूलाच आमची प्रॅक्टिकल लॅब होती .प्रॅक्टिकल संपायला फक्त एक तास बाकी असताना मी खिडकीजवळ येऊन उभा राहायचो . सोमवार आणि मंगळवारचेच प्रॅक्टिकल ग्राउंडफ्लोअर लॅबमधे व्हायचे .बाकीचे दिवस मला तीच अजिबात दिसायची नाही .मंगळवारी संध्याकाळी कॉलेज सुटल्यापासून मी पूर्ण आठवडाभर सोमवारच्या प्रॅक्टिकलची पाहात राहायचो .मला प्रॅक्टिकलमध्ये बाहेर पाहताना एकदा दोनदा लॅब असिस्टंटने पकडलही होत आणि माझी कंप्लेटसुद्धा केली होती .पण मला काही फरक पडत नव्हता मी काही ना काहीतरी कारण शोधून खिडकीकडे जायचो .स्मिताला पाहिल्यावर मी आपोआप रिफ्रेश व्हायचो .तीच दिसणं , तीच बोलणं ,तीच हसण हे आठवूण आठवूणच आठवडा काढावा लागायचा या दोन दिवसांमुळेच माझा पूर्ण आठवडा चांगला जायचा .इतकच नाही दोन आठवड्यापूर्वी सुट्टीत घरी येण्याआधी या सुट्टीच्या काळात तिची भेट होणार नाही म्हणून मी किती निराश झालो होतो हे ही मला आठवत होत .पण आता हे सगळ आठवून काही उपयोग नव्हता .पप्पांना दिलेल्या शब्दानुसार मला हे सर्व विसरूनच जाव लागणार होत .

माझ्या सुट्ट्या संपल्यानंतर मी पुण्याला आलो .कॉलेजही सुरू झाल , सेकंड यिअरला डिप्लोमा करून काही मूल न्यू ऍडमिशन आली होती त्यात तीन मूल आणि दोन मुली होत्या .ती मूलही आता आम्हाला जॉइंट झाली .आता कॉलेजमधे आमचा चांगलाच ग्रूप बनला होता .डिप्लोमा करून आलेल्या मुलांपैकी विशाल आणि आदित्यला होस्टेलमध्ये आमच्या रूमच्या बाजूच्या जागा मिळाली ते दोघेही विकीसारखेच अगदी बिनधास्त होते .फर्स्ट यीअर इंजीनियरिंगमधे न्यू ऍडमिशन यायला सुरुवात झाली होती . दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही फ्रेशर्स पार्टीची तयारी सुरू झाली .विकी या सर्वात फार इंटरेस्ट घेत होता .पार्टीसाठी हॉलच्या डेकोरेशनची जवाबदारी आम्हा मुलांचीच होती त्या साठी आम्ही ग्रुप बनवले होते .स्टेज डेकोरेशनची जवाबदारी आमच्या ग्रुपचीकडे आली .आम्ही डेकोरेशन पूर्णसुद्धा केल पण विकीला ते अजिबात आवडलं नाही .त्याला त्याने ठरवल होत अगदी तसच डेकोरेशन हव होत मग पुन्हा आम्हाला सर्व डेकोरेशन उतरवून रात्री आठपर्यंत कोलेजमध्येच थांबून त्याला हवं होतं तस डेकोरेशन तयार कराव लागल .अँकरिंगसुद्धा विकीच करणार होता त्या साठी त्याने फार मेहनत केली होती .पार्टीच्या एक दिवस आधी रात्री एक वाजता मला जाग आली .मी पाहिलं तेव्हाही विकी अँकरिंगचीच प्रॅक्टीस करत होता .हा सगळा प्रकार पाहून त्याच्या मनात काहीतरी वेगळच चालू आहे याची मला जाणीव झाली .परीक्षेच्या काळात अभ्यासासाठी रात्री फक्त बारापर्यत विकी कधी जागा राहिला नव्हता आणि आता फक्त अँकरिंगसाठी हा इतकी मेहनत घेतोय हे पाहून काहीतरी गडबड आहे हे माझ्या लक्षात आलं .

" विकी रात्रीचा एक वाजलाय .हे जे काही करतो आहेस त्याच कारण सांगशील ??" मी विचारलच .

" काही नाही रे सहजच .अॅकचुअली शेवटच अँकरिंग करून दोन वर्ष झाली आहेत .थोडी भीती वाटतेय म्हणून प्रॅक्टीस करतोय ." त्याने थातूर मातूर उत्तर देऊन मला उडवून द्यायचा प्रयत्न केला .

पण मीही असा हार माननारा नव्हतो. तो वॉशरूमला गेल्यावर मी त्याने टेबलावर ठेवलेली अँकरिंगची स्क्रिप्ट पाहीली .जवळ जवळ तीन पेजची स्क्रिप्ट लिहली होती त्याने आणि त्यात कवितांपासून शायरीपर्यंत सर्व काही होत .मी त्याची स्क्रिप्ट लपवून ठेवली तो जेव्हा वॉशरूममधून परत आला तेव्हा स्क्रिप्ट शोधू लागला आणि जेव्हा त्याला कुठेच मिळाली नाही तेव्हा आपोआप माझ्याकडे आला .

" अभी, माझी स्क्रिप्ट कुठेय ??" त्याने विचारलं.

" तुझी स्क्रिप्ट मला काय माहीत .ती तुझ्याकडे असायला हवी ."

" अभ्या देना यार..... नको तेव्हा काय मस्करी करतोयस ."

" मग मला आधी डीटेलमध्ये सांग एवढी मेहनत कशासाठी चाललिय ??"

" अरे बोललो ना ....."

" ते नाही खर कारण सांग ."

दोन मिनिटं थांबून तो बोलू लागला .

" बर मग ऐक .न्यूटनबाबांची स्टोरी माहिती आहे ना ??" त्याने विचारल .

" कोण न्यूटनबाबा ??"

" अरे आयझॅक न्यूटन ."

" त्याच काय ??"

" ज्या प्रमाणे न्यूटनला सफरचंदांच्या झाडाखाली बसून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला .तसच काही दिवसापूर्वी मला या रूमच्या पंख्याखाली झोपून एक गोष्ट लक्षात आली ." तो म्हणाला .

विकी कधी कधी अशा कॉमेडी लँग्वेज मधे बोलायचा .

" आयला ! कोणती गोष्ट जाणवली रे इतकी ??" मी सुद्धा तशाच भाषेत विचारलं.

" अरे मी जस्ट दुपारी असाच बेडवर पडलो होतो तेव्हा माझ लक्ष खिडकीवर गेल तर तिथे मला काय दिसल ."

" काय दिसल ??"

" चड्डया....आपल्या तिघांच्या ....वाळत टाकलेल्या "

" काय ? ? ...........तुझा पॉईंट काय आहे ? ?" मी थोडं कन्फ्युज होऊन विचारलं .

" मला सांग दरवर्षी पावसाळ्यात तुला कसल टेंशन असत ?"

" माझी चड्डी, म्हणजे माझे कपडे सुकणार की नाहीत याच थोडंफार टेंशन असत ." मी प्रामाणिकपणे उत्तर दिलं .

" माझ आणि देवचही सेम आहे यार .मी आता सुट्टीत माझ्या बी एस्सी , बी कॉम करणाऱ्या मित्रांना भेटलो त्यांना पावसाळा आला की गर्लफ्रेंडला डेटवर कुठे न्यायच ? , तिला घेऊन कोणत्या ढाब्यावर जायच ? तिथे जाताना घरी काय सांगायच ? त्यांना याच टेंशन असत .मला सांग आपण इंजिनिअरिंगवाल्यांनीच काय पाप केलय ?

अजून किती वर्ष आपण चड्डी सूकवण्याच टेंशन घेत राहणार ?

उद्या आपल्या मुलांनी आपल्याला विचारले की आपण कॉलेजमध्ये जाऊन काय केल ? तर आपण त्यांना अस उत्तर द्यायचं की,

" आम्ही फक्त चड्डया सूकवल्या ."

 

 

abhishek dalvi <abhishekdalvi966@gmail.com>

Aug 18, 2018, 10:02 PM (12 days ago)

to aditya

 

5)

" तू तुझा पॉईंट क्लिअर कर .तू आता नक्की काय करायच ठरवल आहेस ??" मी पुन्हा विचारलं .

" फर्स्ट यीअरमधे जमल नाही पण आता मी गर्लफ्रेंड पटवणारच .तू फक्त बघत बस उदया अशी जबरदस्त अँकरिंग करतो ना की सगळ्या फ्रेशर्स मुली इंप्रेस झाल्याच पाहिजेत .कोणालाही प्रपोज केल्यावर ती लगेच हो म्हणाली पाहिजे ."

विकी इतक्या कॉन्फिडंटली बोलत होता की त्याचा तो कॉन्फिडन्स पाहून मला वाटल की पार्टीत किमान दहा बारा मुलींशी तरी त्याची फ्रेंडशिप सहज होईल .पण बिचाऱ्या विकीच नशीबच फुटक .पार्टीच्या आधी आम्ही फ्रेशर्सची लिस्ट पाहीली .फर्स्ट यीअरची परिस्थितीसुद्धा आमच्या सारखीच होती त्यांच्या क्लामध्ये सत्तर मूल आणि मुली फक्त तीनच होत्या .त्यातल्या दोन अपसेंट होत्या .एक आली होती पण बाकीच्या मुली नसल्याने तीही पार्टी अटेंड न करता निघून गेली .मुलींना इंप्रेस करायला विकीने इतकी मेहनत घेतली पण पार्टीत एकही मुलगी नव्हती .आम्ही सगळी फक्त मुलच होतो त्या दिवशी आम्ही विकीची जाम खेचली .तो बिचारा इतका निराश झाला की रात्री मेसमध्ये जेवायला सुद्धा आला नाही .मग आदित्यच बाईकवरून जाऊन त्याच्यासाठी पार्सल घेऊन आला .

आदित्य आणि विशालकडे बाईक होत्या ते दोघ आमच्याच ग्रुपला जॉइंट होते .आम्ही बाईकवरून आठवड्यातून किमान दोनदा तरी कुठे ना कुठे तरी फिरायला जायचो .तस रात्री साढेदहा नंतर हॉस्टेल बाहेर जायला मनाई होती पण दोन सिगरेट दिल्यावर वॉचमन आम्हाला रात्री उशिरा मागच्या गेटने आत घ्यायचा .आमच्या बरोबर डिप्लोमाचा अजून एक रतन नावाचा मुलगा असायचा त्याच घर कॉलेजपासूनच जवळ होत .गावात त्याची शेती होती आणि शेतजमिनीवर अजून एक घर होत .ते त्याच्या काकांच होत पण ते मुंबईला असल्याने ते घर खालीच असायच .आम्ही रात्री तिथे जायचो .आम्ही म्हणजे देव सोडून आमचा बाकीचा सर्व ग्रुप कारण आम्ही जेव्हा ही देवला येण्याबद्दल विचारायचो तेव्हा त्याच एकच उत्तर ठरलेलं असायचं .

" अरे आपले आई बाबा इतक्या लांब आपल्याला शिकायला पाठवतात ना . त्यांना कळल आपण इथे येऊन असले प्रकार करतोय तर त्यांना काय वाटेल ?" तो अस उत्तर द्यायचा याचा अर्थ तो सभ्य किंवा साधूसंत होता अस काही नाही .एकदा तो आमच्या बरोबर रात्री बाहेर आला होता त्या रात्री आम्ही हॉस्टेल जवळच्या एका बँक्वेट हॉलमध्य गेलो होतो तिथे एक मॅरेज रिसेप्शन चालू होतं .तिथे आम्हाला आदित्य आणि विशाल घेऊन गेले होते त्यांच्या मते हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांनी नेहमी नेहमी मेसमधे जेवण्यापेक्षा कधी कधी अशा रिसेप्शन आणि पार्टीमध्ये जाऊन पोटपूजा करायची असते .आम्ही त्यांचंच ऐकून गेलो होतो विशाल तर इतका नालायक होता तो मॅरेज कपलला एक रिकामं प्रेसेंट पॉकेट सुद्धा देऊन आला .ती लोक बिचारी विचार करत असतील विशाल मुलाकडून आलेला की मुलीकडून ? तिथून हॉस्टेलवर येईपर्यंत बारा वाजले होते .वॉचमनने आम्हाला मागच्या गेटने आत घेतल .आम्ही बिल्डिंगमध्ये आलो तेव्हा आम्ही पाहील .हॉस्टेलचा वॉर्डन मेनगेटने राउंडसाठी येतोय .आम्ही पाचही जण त्याला पाहून पटकन झाडाच्या आडोशाला लपलो .वॉर्डनला पाहून वॉचमन त्याच्याकडे गेला ते दोघ उभं राहून काहीतरी बोलत होते .आमच्या फ्लोअरवर जाण्यासाठी जो जिना होता तो बिल्डिंगच्या दुसऱ्या टोकाला होता . वॉर्डनसमोरून तिथे जाण अशक्य होतं .

" अरे देवा ." देव म्हणाला .

" काय झालं ?" मी विचारलं .

" मी घाईघाईत रूमच्या दरवाज्याला बाहेरून कड़ी लावलीय ." देव म्हणाला .

देव जेव्हा हे बोलला तेव्हा आमच्या पाया खालची जमीनच सरकली .जर आम्ही रूममधे नाही हे वॉर्डनने पाहिल तर आमचे बारा वाजणार इतक नक्की होत .

" आता काय करायचं ??" मी विचारलं.

" त्याने आपल्याला पकडल तर .....आपल्याला बाहेर यायलाच नको हव होत , आता लागली ना वाट " देव बोलत होता .वॉर्डनला बघूनच त्याला घाम फुटला होता .

" घाबरू नका रे .तो आता ग्राउंडफ्लोरवर आहे , मग तो फर्स्ट फ्लोअरवर जाणार आणि मग आपल्या फ्लोअरवर तो पर्यंत आपण रूमपर्यंत पोहचू शकतो ." विशाल बोलला .

" पण वर कस जायच ?? जिना बिल्डिंगच्या त्या टोकाला आहे ." विकीने विचारलं.

" या सांगतो ." बोलून तो बिल्डिंगच्या मागे जाऊ लागला .त्याच्या बरोबर आम्ही ही बिल्डिंगच्या मागे आलो .

आजुबाजूला पाहून थोडी दूर पडलेली लाकडाची शिडी त्याने उचलली .आम्ही बिल्डिंगच्या ज्या टोकाला उभे होतो तिथे होस्टेलच्या तिन्ही फ्लोअरचे वॉशरूम होते .ती शिडी त्याने फर्स्टफ्लोरच्या वॉशरूमच्या खिडकीला टेकवली .

" ऐका ! आपण शिडीने फर्स्टफ्लोरच्या वॉशरूममध्ये जाऊया आणि तिथून निघून पळत जिन्यापर्यंत जाऊन रूममध्ये जाऊया .वॉर्डन वॉचमनशी बोलून ग्राउंडफ्लोर चेककरे पर्यंत आपण रूममध्ये पोहचू ." विशाल म्हणाला .

त्याने डिप्लोमाही हॉस्टेलवर राहूनच केला होता त्याला या गोष्टींची सवय असावी . त्याची आयडीया बरोबर होती असंही आमचा वॉर्डन म्हातारा होता तो वर येईपर्यंत आम्ही रूममध्ये पोहचू शकत होतो .शिडीवर चढून आम्ही एक एक करून वॉशरूमच्या उघड्या खिडकीतून आत आलो .आतमधे अंधार होता . खिडकीतून थोडाफार प्रकाश आत येत होता .आम्ही वॉशरूमच्या दरवाजाजवळ पोचलो तेव्हा आम्हाला दुसरा शॉक बसला कारण वॉशरूमच्या दरवाजाला बाहेरुन कोणीतरी कड़ी लावली होती .आमचा हा प्लॅन पूर्णपणे फेल झाला .आम्ही पुन्हा खाली जाण्यासाठी खिडकीकडे वळलो .आदित्यने घाईघाईत शिडी पकड़ायचा प्रयत्न केला आणि त्याच्या धक्याने शिडी भिंतीपासून वेगळी होऊन खाली पडली आमचा परतीचा मार्गही बंद झाला .

" आता करायच ?? आपण इकडेच अडकून पडलो यार ." देव बोलला त्याच्या आवाजावरून तो रडकुंडीला आलाय हे साफ जाणवत होत .

" आता आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही . वॉर्डन कोणत्याही क्षणी रूमपर्यंत पोहचेल ." आदित्य म्हणाला .

तितक्यात आम्हाला बाहेरुन कोणाच्या तरी बुटांचा आवाज ऐकू येऊ लागला .कोणीतरी इथेच चालत येत होत वोर्डनशिवाय दुसर अजून कोणी असणं शक्यच नव्हत .तो बुटांचा आवाज वॉशरूमच्या दरवाजाजवळ येऊन थांबला .वॉर्डन वॉशरूमच्या दरवाजासमोर आलाय हे मला कळत होत .मी लक्ष देऊन तो आवाज ऐकू लागलो बाहेरुन दरवाजाची कडी उघडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला .तो ऐकून आमचा श्वास गळ्यातच अडकला .विकी मला आणि देवला घेऊन बेसिन खाली जाऊन लपला .आदित्य आणि विशाल टॉयलेटमध्ये जाऊन लपले .आजूबाजूला पूर्ण अंधार होता वॉर्डनने दरवाजा उघडला .दरवाजा बाहेरची ट्यूबलाईट तुटली होती थोडी दूर असलेल्या लाईटचा थोडाफार प्रकाश दरवाजातून आत येत होता .पण आम्ही बेसिनखाली अंधारात लपलो होतो तेवढ्याशा प्रकाशात तो आम्हाला पाहू शकत नव्हता .पण जेव्हा त्याने वॉशरूममधला लाईट ऑन करायला बटणं दाबायला सुरुवात केली तेव्हा मात्र आम्ही भीतीने बेशुद्ध होणार होतो .पण आमचं लक चांगलं होत वॉशरूमधली ट्यूबलाईट खराब होती त्या वेळी

1 2 3 4 5 6 7 8 9 10
Go to page:

Free e-book «कदाचित हेच आहे प्रेम, अभिषेक दळवी [short books to read TXT] 📗» - read online now

Comments (0)

There are no comments yet. You can be the first!
Add a comment