readenglishbook.com » Essay » Bhoot asta?, Nishad Kanhere [cat reading book .txt] 📗

Book online «Bhoot asta?, Nishad Kanhere [cat reading book .txt] 📗». Author Nishad Kanhere



1 2
Go to page:
चढला आणि लगेच ३-४ बस stop नंतर उतरला. मला वाटलं की इतक्या दिवसांनी मी त्यातुन बाहेर आलोच होतो की नेमकं हे असं काहिसं घडलं आणि पुन्हा डोक्यात वेगवेगळे विचार डोकावू लागले, ज्याने मी पुन्हा आणखी जास्त अस्वस्थ झालो. आमच्या घराजवळ कुठे येत असेल नेहमी हा ह्याचा माझा मग जासूसी खेळ सुरु झाला, जरी मला तो समोर आलेला ही अजिबात आवडत नव्हतं. अगदी हुबेहूब माणूस होता तो, मला तर अगदी खात्रीच पटली होती की तोच होता तो, जो आता भूत होवून आला असेल. वडील म्हणाले होते ते आठवलं, की तो मला त्रास द्यायला येणार ते. डोक्यावरचे केस गेलेले, मागे अर्ध चंद्र टक्कल, दात सगळे ओबड धोबड, खूपच वय, अंदाजे ७०, पाय फेन्गडे आणि चाल अगदी तशीच जसा तो ट्रेन समोर धावून आला तसा तेव्हा. मलाच का ह्या सगळ्याचा देव त्रास देतोय असंच तेव्हा खुप वाटायचं. एकीकडे तो कुठे काम करतो त्याची माहिती मिळवावीशी वाटायची आणि एकीकडे तो कधीही पुन्हा प्रत्यक्ष समोर येवूच नये असं वाटायचं. बरं पुन्हा आता हे सगळं कोणाला सांगितलं जरी असतं तर कोण विश्वास ठेवणार होतं? मला हळू हळू खात्री पटू लागली की हे भूत असावं आणि कदाचित मला छळायला आलं असावं, कारण मी त्याला मरताना प्रत्यक्ष बघितलं होतं. पण मला ते सगळं दृश्य आपणहून च दिसलं होतं ना मग माझा काय त्यात दोष? असे कितीतरी विचार सतत येत होते माझ्या त्या कोवळ्या मनांत त्या वेळेला. पुन्हा काही दिवस जरा विसर पडावा असे गेले आणि पुन्हा अचानक मी शाळेला जात असताना तो दुपारी एका बसमधून उतरला आणि माझ्या समोरून गेला. त्याला अचानक बघुन माझ्या मेंदुतून अचानक वीज चमकल्यासारख झालं आणि पुन्हा मला अतिशय त्रास होवू लागला. कशातही लक्ष लागेना, कुठले तरी भयंकर विचार मनांत येवू लागले. त्याच्या अपघातानंतर मला आपणहून कर्ज सिनेमातलं गाणं च का आठवावं? त्या धुन चा आणि पुनर्जन्माचा काही खरंच संबंध आहे का? डोकं बरेच वेळा सुन्न व्हायचं. आजी कधी यायची तेव्हा मी भूतं कशी ओळखायची वगैरे विचारायचो. तिने सांगितलं होतं की भूतांचे पाय उलटे असतात, मग काय विचार केला की पुन्हा तो दिसलाच म्हातारा तर त्याचे पाय बघेन आणि मोकळा होईन. काही दिवसांनी तो कुठे काम करतो ते मला समजलं. मी एकदा शाळेतून येत असताना एका केमिस्ट शॉप वरून जाताना तो म्हातारा त्या दुकानात बसलेला मला दिसला. मी पटकन तिकडून गेलो होतो त्यामुळे आणि तो तेव्हा तिकडे गिऱ्हाईक सोबत बोलत होता, त्याने मला बघितलेलंच नव्हतं. मग काय दुसऱ्या दिवशीपासून तिकडून जायचा रस्ता ही बदलला, मित्र बरोबर असले की काही कारणं सांगायचो नवीन रस्ता घेण्यासाठी. किती लांब रस्ते शोधायचो जा ये करायला, खरं म्हणाल तर एका अर्थी मी वेडाच झालो होतो. मानसिक धक्क्यात वावरत होतो मी, एकटाच. एकदा मी विचार केला की बिनधास्त त्याच्या समोरच जायचं, काहीच घाबरायचं नाही. १ मित्र होता, त्याला काही ओषध घ्यायचं होतं, म्हणुन त्याच्याबरोबर बिनधास्त त्या दुकानात गेलो. मी टक लावून त्याच्याकडे बघत होतो, जेणेकरून मी अजिबात घाबरलेलो नाही हेच मला त्याला दर्शवून द्यायचं होतं. आश्चर्य म्हणजे मी जितक्या वेळ त्याच्या डोळ्यात डोळे घालुन बघत होतो, तेवढा वेळ तो ही एकटक माझ्याकडे बघत होता. मग मात्र माझी पाचावर धारण बसली होती. तो दुकानात जेव्हा आत बाहेर करत होता तेव्हा मी त्याचे पाय बघण्याचा खूप प्रयत्न केले, पण त्याची pant खुप मोठी होती आणि त्याने त्याचे पाय सगळे झाकले गेले होते. तो जेव्हा कोणाशी बोलायचा तेव्हा त्याचे विचित्र, ओबड धोबड दात बघून वाटायचं की इतका जबरदस्त फटका त्याला त्याच्या जबड्यावर बसला म्हणून कदाचित दात सगळे असे झाले असावेत. मी सगळ्याचा अर्थ त्याचा नक्की पुनर्जन्म किंवा ते भूत असावं असाच लावत होतो. कारण तशीच सगळी परिस्थिती होती ती. साधारणपणे १ वर्ष हे सगळं चालु होतं, पुढे काही महिन्यांनी तो ही गायब झाला, आणि मी ही हळू हळू त्यातुन बाहेर येवू लागलो. हळू हळू मोठा होत होतो आणि इतर गोष्टींमध्ये रमू ही लागलो. दहावीच्या अभ्यासात व्यस्त होत गेलो. त्यानंतर अनेक असे छोटे मोठे अपघात बघितले, मग भिती ही कमी होवू लागली. प्रत्येक वेळेस त्या पहिल्या भीषण अपघाताची आठवण तर व्हायचीच.

आता इतक्या वर्षांनी असं वाटतय की तेव्हा जर मी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुक्ष्म घरी सांगितल्या असत्या तर मला नक्कीच मानसोपचारतज्ज्ञ बघायला लागले असते. पण मी सगळं ते त्या वयात पचवत आलो. मनावर तो अपघात इतका कोरला गेलाय, आत मनात खुप खोलवर त्याची पाळमूळ रुजली आहेत की आज २८ वर्षं झाली त्या घटनेला परंतु आज ही तो अपघात आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या ताज्या आहेत मनांत, ह्याचा अंदाज तुम्हाला आला असेलच सगळी गोष्ट वाचून. मग काय वाटतं भूत असतं की नाही?

Imprint

Publication Date: 01-22-2018

All Rights Reserved

1 2
Go to page:

Free e-book «Bhoot asta?, Nishad Kanhere [cat reading book .txt] 📗» - read online now

Comments (0)

There are no comments yet. You can be the first!
Add a comment