Homemade Vacation, Nishad Kanhere [classic english novels .TXT] 📗
- Author: Nishad Kanhere
Book online «Homemade Vacation, Nishad Kanhere [classic english novels .TXT] 📗». Author Nishad Kanhere
पोहोचणं भाग होतं. सगळ्यांचा निरोप घेताना खुप जड जात होतं. आत्तापर्यंत ते आमचे नातेवाईक होवून गेले होते, कारण नातेवाईक बरयाच दिवसांनी परतताना जसा त्रास होतो तसाच त्रास होत होता. एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या, फ़ोन नंबर्स एक्स्चेंज झाले, फ़ोनवरुन टच मध्ये राहायचंय अशी आश्वासनं झाली. किशा भाऊ तर आपणहुन सकाळी उठुन आदिशच्या बेडजवळ गेला होता. ते सगळे आदिशला खुप मिस करणार होते. आदिश खुपच लाघवी आहे. त्या सगळ्यांची एव्हढी गट्टी जमली होती आदिशबरोबर की गेल्या ३-४ दिवसांत ते आदिशचे काही कॉपीराइट्स असलेले शब्द म्हणायला लागले होते. उदाहरणार्थ वाया (वारा), आईट (लाईट), चब्बा (संपलं) वगैरे वगैरे. आयुषला शाळेत सोडलं. त्यालाही खुप जड जात होतं, पण तो जास्त एक्सप्रेस करत नाही. तो सकाळपासुन विचारत होता की तो संध्याकाळी घरी येईल तेव्हा हे कोणी नसतील का? सगळ्यांनाच जड होत होतं.
एअरपोर्टला जायला निघालो आणि अगदी वेळेतच आम्ही पोहोचलो. थोड्यावेळाने सगळे आपापल्या होस्ट च्या गाड्यांमधुन पोहोचले. मग पुन्हा तिकडे एकदा रडारडीचा एक अगदी छोटासा कार्यक्रम पार पडला. दिप्तीला खुपच जड गेलं, ती खुपच हळवी आहे मनाने. ह्या सगळ्यांशी आम्ही एक अतुट नातं बांधलं होतं त्या ५ दिवसांत. दिलीप काकांनी तर दिप्तीला शब्द ही दिला की पुढच्या वेळेला मी तुझ्याकडे राहीन म्हणुन. खुप भरुन पावल्यासारखं वाटलं तेव्हा. त्यांनी आपलं सहज विचारलं दिप्तीला त्या चाटणाबद्दल, त्यांना वाटलं विसरली असेल ह्या गडबडीत, पण दिप्तीने ते बॅगेतुन काढुन दिल्यावर ते थक्कच झाले. थोड्यावेळाने जितु देखील त्याच्या भावाबरोबर पोहोचला, मग त्याची सगळे खेचायला लागले.
आणि अचानक एकमेकांना अनेक बाय बाय करत सुयोग ची "वा गुरु" ची टीम अदृश्य झाली.
Imprint

Publication Date: 06-04-2012
All Rights Reserved
Free e-book «Homemade Vacation, Nishad Kanhere [classic english novels .TXT] 📗» - read online now
Similar e-books:
Comments (0)