प्रतिबिंब, अभिषेक दळवी [free novel reading sites .TXT] 📗
- Author: अभिषेक दळवी
Book online «प्रतिबिंब, अभिषेक दळवी [free novel reading sites .TXT] 📗». Author अभिषेक दळवी
" बोला "
" सायेब याच्या आधीचा खून बी असाच झाला होता त्याला बी पाण्यात बुडवून मारला होता पण इथे चिखलात फक्त मरणाऱ्याच्या पायाचे ठसे होते त्याला कोणी मारला असेल तर त्या माणसाच्या पण पायाचे ठसे इथे असायला हवे "
मानेँच बोलण ऐकून पवार विचारात पडले त्यांच म्हणणं खर होतं .जर कोणी खरच खून केला असावा तर त्याचे पायंाचे ठसे चिखलात नक्की असायला हवे ते नव्हते मग हा खून नव्हता तर मग हे बुडुन मेले यालाही काही आधार नव्हता कारण चंद्या आणि कुश्या दोघांचे खून एकाच ठिकाणी एकाच पध्दतीने झाले होते दोघांनी जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड चिखलातील ओरखद्यावरून स्पष्ट दिसत होते त्यांचे पाय पकडून कोणीतरी त्यांना पाण्यात ओढल होतं हे त्यांच्या पायाच्या नखाच्या ओरखद्यावरून दिसत होतं मग नक्की प्रकार काय होता .
" तुमचं नक्की काय म्हणणं आहे माने . . . .या वर " पवार मानेजवळ येत बोलले .
कितीही झाल तरी माने पोलीस खात्यात पवारांपेक्षा अनुभवी नक्कीच होते .
" सायेब मी लहान असताना पण असच एकदा घडलं होतं माझा चुलता पोलीसात शिपाई होता तो एकदा माझ्या वडिलांना सांगताना मी एकल होतं .
आमच्या गावच्या तलावात असेच लोक बुडुन मरत होते .तलाव बघायला गेल तर अगदी छोटं होतं जास्त खोलही नाही पण तरीही लोक बुडत होती आणि हे फक्त रात्रीच व्हायचं बरं सकाळी लोकांना तळ्याच्या काठावर मूडदे भेटायचे अगदी असेच . . .
पोलीसांना ही पहिल्यांदा काही समजत नव्हतं पण नंतर हे वाढतच चालू होतं सगळे जण एकाच रितीने मरत होते .हळु हळु लोकांनी तिकडे जायच पण टाकलं .मला तर घरातून ताकिदच देऊन ठेवली होती की चुकूनही तिकडे फिरकायच नाही म्हणून गावातल्या पारावर बायकांच्या घोळक्यात याचीच चर्चा चालू असायची लोकांनाही हळुहळु संशय येत होता की हे दिसत तितक साध नाही त्या तळ्याकाठी एका म्हातारा रहायचा तिथेच त्याची जमीनपण होती तिच्यावर अनेकांचा डोळा होता जमीन हडपण्याचे प्रयत्न ही झाले शेवटी त्या म्हाताऱ्याला तलावात बुडवून मारला आणि त्यानंतर तिथे मूडदे मिळायला लागले त्यातली जास्त माणस तीच होती ज्यांनी जमीन हडपन्याचा प्रयत्न केलेला लोक म्हणतात त्याचा जीव त्या जमिनीत अडकलाय म्हणून त्याला मुक्ति . . . . . . . . . "
" बास माने बास " वैतागून पवार बोलले .
हा विषय आता अंधश्रद्धेकडे वळू लागलेल पाहुन पवारांना असह्य झालं .पोलीसी पेश्या नुसार डोळ्यांनी बघितलेल्या आणि कानंानी ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायची त्यांना सवय होती म्हणून मानेंच हे बोलन त्यांना पटत नव्हतं .
" अहो सायेब खर आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलयं " मानेही बोलले .
तेही हार माननाऱ्यातले नव्हते ते आपले म्हणणं पटवून देण्याचा ते पूर्ण प्रयत्न करत होते .
" म्हणजे हे प्रकरण पण तसचं आहे हे तुम्हाला म्हणायचय " पवार अजूनही मानायला तयार नव्हते .
" सायेब तुम्हाला आठवतय तो पहिले दोन मूडदे भेटले होते "
" हम्म "
" त्याच्या नंतर तर हे सगळ सुरू झालय आधी कधी इथे अस घडलं होत का ? "
" माने तरीही माझं मन मानत नाहीये "
" म्हणजे ? मग तुम्हाला काय वाटतंय ? "
" माने काहीतरी . . . .काहीतरी नजरेतून सूटतय "
" सायेब सगळ्याच नजरेने दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास नसतो ठेवायचा त्याच्या बाहेरच्या काही गोष्टी आहेत जगात ज्या दिसत नाहीत पण आहेत .मी आपल तुम्हाला सांगायच काम केल विश्वास ठेवायचा की नाही ते आता तुम्ही ठरवा " एवढ बोलून माने प्रेताजवळ जिथे बाकीचे दोन हवालदार होते त्यात जाऊन मिसळले .
पवार मात्र विचारात पडले जे पहिली मिळालेली प्रेतं त्या नंतरच हे सर्व सुरू झाल होतं .पवारांना शंका येत होती त्या पहिल्या आणि नंतरच्या दोन खुनात काहीतरी संबध असावा .पवार पुन्हा पांडबा आणि नाऱ्याजवळ आले .
" काय रे एका महिन्यात लागोपाठ हे चार खून झालेत एकाच ठिकाणी त्यात दोन तुमचे साथीदार ते पहिले खून झालेल्याना तुम्ही ओळखता ? "
हा प्रश्न ऐकून नाऱ्या पांडबा दोन्ही थोडे बिथरले .
" नाय . . . .आम्ही नाय मारला . . .आम्ही नाय मारला त्यांना " नाऱ्या चाचरत बोलून गेला .
" अरे बाळा तुम्ही मारला की नाही विचारलचं नाही तुम्ही ओळखता की नाही तेवढं सांगा "
" नाय . . .आम्ही नाय ओळखत त्यास्नी " पांडबा कसाबसा म्हणाला .
" ठीक आहे जा तुम्ही पण मला विचारल्याशिवाय गावाबाहेर जायच नाही . .जा . . . ."
दोघांनी या वर नंदी बैलासारखी मान डोलावली .लांडग्याची चाहूल लागल्यावर जस एखाद्या सशाने झाडीत दबा धरुन बसावे आणि तो निघून गेल्यावर जीव घेऊन पळत सुटावे तसे ते जा म्हटल्यावर तरातरा निघून गेले .
त्या पहिल्या खुनाचा विषय काढल्यावर या दोघांचे बिथरन पवारांच्या नजरेतून सुटलं नव्हतं पण संशयाला काही जागा नव्हती . पुढेमागे यांना चौकशीला बोलवू असा विचार करून त्यांनी सोडून दिल .
आता सूर्य बराच वर आला होता . ते नदी पासून आता दूर आले होते .आज थोडी गरमी जाणवत होती कपाळावर घर्मबिंदु जमा होतं होते .वाटेवर लोक दिसत नव्हती गाव कामाला लागल होतं .
" नाऱ्या त्या पवारानं शक केलाय वाटत आपल्यावर आता असा तसा नाय सोडणार आपल्याला " पांडबा ओढ्याकडच्या दिशेने एक पाहत म्हणाला .
" नाऱ्या तू अस बावचळायला नाय पायजे व्हतंस " पांडबा नाऱ्याकडे पाहत म्हणाला .
नाऱ्याच पांडबाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हत तो खाली मान घालून आपल्याच विचारात चालला होता .
" आर मी काय बोलतोय "
नाऱ्याकडून काहीच प्रतिसाद नाही .
" नाऱ्या " त्याला खांद्याला धरून हलवत पांडबा म्हणाला .
" काय हां . .हा . .हा " दचकून नाऱ्या म्हणाला .
" आर हां हा काय ? म्या काय म्हणालो ? "
" हां . . . .काय ते ? "
" नाय . .काय नाय काय नाय . . .मी चाललो चल रात्री भेटू " म्हणत नाऱ्या त्याला टाळून दुसऱ्या पाय वाटेने जाऊ लागला .पांडबाने त्याला हाक मारून थांबवायचा प्रयत्न केला पण त्याने वळून सुध्दा पाहिलं नाही मुद्दाम दुर्लक्ष करत असावा पांडबाने जास्त लक्ष नाही दिल तो आपल्या रस्त्याला लागला .
पांडबा घराजवळ आला घर छोटं होत फक्त ऐसपैस होतं एवढंच .घराची पूर्ण रया गेली होती . भिंतींवर कधीकाळी रेव्याचा रंग मारला होता तो उडून गेला होता .मातीच्या भिंतींना मुठीएवढे खड्डे पडले होते .बाजूच्या गोठा ओसाड पडला होता वरच नारळाच्या झावळीच छप्पर केव्हाच उडून गेल होतं . जिथे आधी गाई म्हशीच हंबरण ऐकू यायच तिथे आता दावणीची दोरी बांधायच्या खूँट्याशिवाय काही दिसत नव्हत .शेणाने सावरलेल्या अंगणातलं शेण पावसाबरोबर केव्हाच वाहून गेल होतं आता फक्त दगडगोटे पायाला लागत होते .
पांडबा घराच्या दरवाजापर्यंत पोचला दरवाजा फक्त ओढून घेतला होता .तो पहिल्या खोलीत आला तुटलेल्या कौलातून सूर्य प्रकाश खोलीत पसरलेला होता . रकमा तिथे नव्हती माजघरात जाऊन पाहिल तर ती तिथेही नव्हती .बाजूला चुल धगधगत होती त्या वर लाकडाच्या आगीने काजळी लागलेल्या अल्युमिनियमच्या टोपात आधनाचं पाणी ठेवलं होतं .चुलीतली लाकड केव्हाच जळून गेली होती तांबडेभडक निखारे फक्त दिसत होती .पांडबा लवकर येईल अस समजून सकाळीच चुलीवर पाणी ठेऊन रकमा कुठेतरी निघून गेली होती .
पांडबाला कडाडून भूक लागली होती म्हणून वेताच्या टोपल्यात असलेले फडकी पाहिली तर त्यात एकही भाकरी नव्हती भाजीचा टोप पाहिला तर त्यात भाजीचा कणही नव्हता ते पाहुन तर त्याचा पारा आणखीनच चढ़ला .
" मायला सकाळ सकाळीच कुठ हुंदडायला गेली ही . . .काय खायला नाय प्यायला नाय " पांडबा दात ओठ खात पुटपुटला .
शेवटी नाईलाजाने चुलीवरच्या टोपातल पाणी बादलीत ओतून तनतनत घराच्या मागे अंघोळीला गेला .अंघोळ आटपून तो परत आला तरी रकमाचा कुठे पत्ता नव्हता शेवटी फणफणत अंगणात येऊन भिंतीवर टेकलेली खाट पाडून त्यावरच आडवा झाला .एक दोन तासांनी घरातून भांड्यांचा आवाज आला त्यानेच त्याला जाग आली .आत जाऊन पाहतो तर चुलीसमोर रकमा बसली होती .पाठमोरी बसली होती तरीही तिला पांडबाची चाहूल लागली असावी थोडी मान वळवून नजरेच्या कोपऱ्यातून पाहिल न पाहिल्या सारख केल आणि नाक मुरडून पुन्हा कामाला लागली .
नुकतंच लग्न झाल होतं तेव्हाची रकमा आणि आताच्या रकमात फार फरक दिसत होता .रंग फारच रापला होता ,त्यावेळीचे हिरवाचूड़ा घातलेले मुलायम हात आता काडक्यांसारखे झाले होते ,पूर्वी मधासारखी लाघवी बोलणारी रकमा आता कट कट करण्याशिवाय काही करत नव्हती ह्या सगळ्याला तोच कारणीभूत होता म्हणा .
" फाटेलाच कुठं निघून गेललीस "
" तुला त्याच्याशी काय करायचय फुकटच गिळाया मिळतय ना मग गिळ गुमान " रकमा बसल्या जागेवरुनच भाजी भाकरीच ताट पांडबाकडे सरकवत म्हणाली .
तो काही म्हणाला नाही त्यालाही आता याची सवय झाली होती त्यांच्यात प्रेम वैगरे आता कुठे राहील होतं म्हणा .आई बापाकडे नाहीत म्हणून नाईलाजाने ती त्याच्याबरोबर राहत होती अस म्हटलं तरी हरकत नाही .
पांडबा त्या भाजी भाकरीवर तुटून पडला . भाजी म्हणजे कसली अळूची आणि भाकरी कोंड्याची या शिवाय त्यांना परवडनार तरी काय होतं .
खाता खाता पांडबाच लक्ष रकमाकडे गेल तिच्या बाजूला पांढऱ्या कपड्यात बांधलेली पोटली दिसत होती .पांडबाने ते बघितलंय हे रकमाच्या लक्षात आल तिने ती लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला पण पांडबाच्या नजरेतून ते सुटलं नाही .
" त्या पोटलीत काय लपवतीयास ?" शेवटी त्याने विचारलच .
" कुठं काय काय नाय त्यात "
" सांगतीयास . . . . .की म्या बघू ? " तोही असा तसा ऐकणार नव्हता .
" तांदूळ हाईत पिनाक्कानं दिलेलं " रकमाने खोटनाट सांगून विषय संपवण्याचा प्रयत्न केला .
" पण पिनक्काला काल म्या तालुक्याला जाताना पायल पोरासंग "
आपल खोट पांडबाने पकडल हे पाहुन ती थोडी चाचरली आणि हे पांडबाच्याही लक्षात आलं .
" तू अशी सांगायची नायस म्याच बघतो " म्हणत तो ताटावरून उठला आणि तिच्याजवळ जाऊ लागला त्याला येताना पाहुन तिने ती पोटली दोन्ही हातांनी छातीशी घट्ट धरून ठेवली तरीही पांडबा समोर तीच काय चालणार होतं त्याने ती हिसकावलीच .रकमा उठून उभी राहिली त्याने पोटली खोलली तर भराभर तांदूळ खाली सांडले आणि त्या बरोबर दोन सोन्याच्या पाटल्याही .
" हे काय हाय ? " पांडबाने त्या जमिनीवर पडलेल्या पाटल्या हातात उचलत विचारलं
" मला नाय माहीत " रकमा तोंड फिरवत म्हणाली .
" मी इचारतोय हे काय हाय ? पांडबाने तिच्या केसांना हीसडा देऊन विचारलं .
" आरं घर चालायला पैक नाय तूझ्याकडून काय मिळायची आशा नाय . . . . . "
" कुठंना आणलस ? "
" ते वहिनी साहेब "
" चोरलस ? "
" चोराचीच बायको . . .चोरी नाय तर काय . . . . . . . ."
ती पुढे काय बोलायच्या आतच गालावर एक चपराक बसली ती तशीच कोलमडून बाजूला जाऊन पडली .पांडबा तनतनत बाहेरच्या खोलीत आला कोपऱ्यात त्याच्या संपलेल्या दारूच्या बाटल्या पडल्या होत्या एकात दोन घोट दारू शिल्लक होती ती पोटात रिझवत तो अंगणातल्या बाजेवर येऊन बसला .आतून रकमाच्या मुसमुसून रडण्याचा आवाज येत होता पण पांडबाला आता त्याने काही फरक पडत नव्हता तो तिथेच बाजेवर आडवा झाला बाजूच्या नारळाच्या झावळ्यांची सावली बाजेवर येत होती . दारूचे दोन घोट त्याच्या झोपेला पुरेसे होते त्यातच त्याला झोप कधी लागली कळलचं नाही .
जाग आली ती सरळ नाऱ्याच्या आवाजाने नाऱ्या त्याला उठवत होता .
" पांडबा आरं पांडबा उठ की लवकर "
" काय रं काय झालया " पांडबाने झोपल्या झोपल्या डोळे चोळत विचारलं .
" आर मयत आलया चंद्याच . . चल "
" इतक्या लवकर कस आल र ? " त्याने उठून बसत विचारलं .
" आर लवकर कुठं संध्याकाळ झालीया . . .चल लवकर "
पांडबा उठून उभा राहिला घरात जाऊन पाहिल तर रकमा घरात नव्हती दुपारी पडलेले तांदूळ तसेच होती ती कुठे गेलीय हा विचार करण्याची त्याला गरज वाटत नव्हती तसाच बाहेर येऊन वहाणा पायात चढवून नाऱ्याच्या पाठोपाठ निघाला
संध्याकाळचे साढ़ेपाच सहा वाजत आले होते . माणस शेतातून परतत होती . शाळेची पोरं दंगा करत घरी परतत होती .नाऱ्या तसाच चालला होता तंद्रीत अगदी सकाळ सारखाच पांडबाला त्याला विचारल्या शिवाय राहवत नव्हतं पण त्याचा स्वभाव पांडबाला माहीत होता पुन्हा आपल्याला टाळून निघून जाईल म्हणून त्याने नाही विचारलं .
चंद्याच घरजवळ आल होतं .बायकांच्या रडण्या ओरडण्याचा आवाज येत होता .घराच अंगन लोकांनी भरून गेल होतं त्यातली अर्धी अधिक लोकं चंद्याला ओळखत ही नसावीत पण रामराव जाधवाच्या घरचं मयत म्हणून औपचारिकरित्या तिथे उभे होते .
नाऱ्या आणि पांडबा अंगणात आले .समोरच गवताच्या चटईवर चंद्याच प्रेत ठेवलं होतं ,गळ्यापर्यंत शरीर सफेद कपड्यात झाकलेल होतं .नाकात कापसाचे गोळे कोंबलेले होते ओठांत तुळशी पत्र दिसत होतं ,बाजूला निरंजन संथपणे तेवत होतं ,चेहरा अगदी सकाळ सारखाच निस्तेज पडला होता .बाजूलाच आई आणि बहीण उर बडवत रडत होत्या आणि का रडू नयेत वयात आलेला असा तरणाताठा पोरं गेलेला कोणत्या आईला सहन होणार ?? पांडबा आणि नाऱ्या आल्या पासून आजुबाजुचे लोकं त्यांच्याकडे पाहत कुजबुजत होते ह्या दोघांच्या नादी लागला आणि मेला असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते .
आपण ही कथा आतापर्यंत जास्तीच जास्त पाहिलीच असेल आणि आशा आहे आपल्याला ही आवडली असेल . या कथेत पुढे काय होत हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला संपूर्ण कथा वाचावी लागेल .पूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा amazon kindle वेबसाईटवर जाऊन “प्रतिबिंब “ किंवा writer abhi टाईप करून पूर्ण पुस्तक प्राप्त करा
https://www.amazon.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A2%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-Marathi-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%80-ebook/dp/B086R4CGP1/ref=sr_1_2?dchild=1&keywords=abhishek+dalvi&qid=1586019155&s=digital-text&sr=1-2
. . . गूढ . . .
इथे थंडी जोर जरा जास्तच होता .वातावरणात शेकटीचा गंध चांगलाच जाणवत होता .दूरवर पसरलेला निसर्ग डोंगरदऱ्या त्यामागून नुकताच वर आलेला चंद्र फारच विलोभनीय दिसत होत .मधेच येणाऱ्या वाऱ्याच्या झूळूके सोबत होणारी पानांची सळसळ कानांना मोहवून टाकत होती .ही मला म्हणालीइतक्या थंडीत बाल्कनीत काय करताय आता तिला कोण सांगनार अस वातावरण नेहमी कुठे अनुभवायला मिळत .दूरवर कोठेही गाड्यांचा आवाज नाही ,माणसांचा कल्लोळ नाही फक्त निरभ्र
Comments (0)