readenglishbook.com » Horror » प्रतिबिंब, अभिषेक दळवी [free novel reading sites .TXT] 📗

Book online «प्रतिबिंब, अभिषेक दळवी [free novel reading sites .TXT] 📗». Author अभिषेक दळवी



1 2 3 4 5 6 7
Go to page:
ना हे सर्व दिसतय तितकं सोप नाही आहे " मानके साहेब बोलून शांत झाले . मी जमेल तेवढी माहिती त्यांच्याकडून मिळवली रतन साहेबांनी त्यांच्या वकिलाशी म्रुत्यूपत्रा संदर्भात बोलणी केलीत हे मला नव्याने कळत होत हा केससाठी फार महत्वाचा मुद्दा होता . पूर्णपणे प्लँन आखून कोणीतरी हा डाव खेळत होत मी लॉजवर येई पर्यंत प्रदीप उठून तयार होऊन बसला होता . आम्हाला बंगल्यावर निघायचं होत तो सगळसामान बंाधून तयार झाला होता .मी त्याला न सांगता गेलो म्हणून जरा भडकलाच माझ्यावर शेवटी काही बाही सांगून त्याला शांत केल . आम्ही दोघ टॅक्सीने बंगल्यावर पोचलो .दारात एक सडपातळ पण काटक, सफेद शर्ट ,सफेद लुंगी ,कपाळावर चंदन लेपलेल ,डोक्यावर टक्कल ,काळा सावळा असा दक्षिण भारतीय माणूस उभा होता . चेहऱ्यावरून तर मला हिंदी सिनेमातल्या गुंडासारखा भासत होता .मिसेस पटवर्धनांचा तो ड्राइव्हर असावा विजयने त्याच नाव काय सांगितलेलं "जगन्नाथ "आम्हाला पाहून तरातरा तो पुढे आला .आमच्या बॅगा घेऊन आत गेला फक्त रुक्ष नजर सोडली तर चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नव्हते . आम्ही तसेच आत आलो डावीकडे डायनिंग टेबल होत .मिसेस पटवर्धन आणि सुनीताचा ब्रेकफास्ट चालू होता .आम्ही त्यांच्या जवळ गेलो .मिसेस पटवर्धन आमच्या पासून पाठमोऱ्या बसल्या होत्या समोर सुनीता बसली होती .आम्हाला येताना पाहून सुनीताने मिसेस शहांना डोळ्याने खूणवल .

" या तुमचीच वाट पाहत होतो तुमच्या राहण्याची इथे व्यवस्था केलीय "मिसेस पटवर्धन पाठमोर्या स्थितितच बोलल्या .

" अाशा आहे लवकरात लवकर निघून जाल " सुनीता खोचकपणे पुटपुटली .

" म्हणजे " प्रदीपने विचारल तिचा रोख त्याच्या लक्षात आला नसावा .

" नाही हिला अस म्हणायचय तुम्ही लवकरात लवकर केसचा निकाल लावाल " मिसेस पटवर्धन तिची बाजू सावरत बोलल्या .

त्यानी मोलकरनीला आमची खोली दाखवायला सांगितली आम्ही तिच्या मागून जाऊ लागलो .वरच्या मजल्यावर समोरा समोर आमच्या खोल्या होत्या बाजूला मिसेस पटवर्धन आणि सुनीताचीही खोली होती ,उजवीकडे जिना होता ,पॅसेज पुढे जाऊन डावीकडे आडव्या गॅलरीला मिळत होता .गॅलरीला कमरेएवढा कठडा होता तिथून पुरेसा प्रकाश आत येत होता .प्रदीप त्याचं सामान ठेऊन माझ्या खोलीत आला ती मोलकरीन यमुना आताच ब्रेकफास्ट देऊन गेली होती .आम्ही दोघं तिथेच बसून ब्रेकफास्ट करू लागलो .

" आजचा प्लँन काय आहे " प्रदीपने विचारलं .

" अमितकडे जायचय " 

" ते पटवर्धन साहेबांचे भाऊ ?? "" हम्म "" ठिकाय आणि तो दुसरा भाऊ विक्रम  ??"" तो अजून सापडलाय कुठे "" बर " ब्रेकफास्ट करून आम्ही खाली आलो खाली कोणीही नव्हत रूममधे सगळे  असावेत .आम्ही तसेच बाहेर आलो .आम्हाला कोणी तरी पाहातय अस मला जाणवलं म्हणून सहज मागे लक्ष गेल गॅलरीत जगन्नाथ उभा होता .आमच्या कडे रोखून पाहात मी त्याच्या कडे दुर्लक्ष करून पुढे निघालो .रतन साहेबांचे चुलत भाऊ अमित यांचा बंगला थोडा दूर होता तिथे पोहचेपर्यंत दुपार झाली .नोकराने आम्हाला बसायला सांगून मालकांना बोलवायला गेला .बंगला तसा प्रशस्थ होता तीस टक्के प्रॉपर्टी यांच्या नावावर होती त्यांच्या मते ती कमी होती त्यांच्यावर अन्याय झाला होता म्हणून रतन साहेबांचे आणि त्यांचे वाद होते .काही वेळाने एक तिशी पस्तिशीचा गोरापान ,स्थूलसा , सफेद शर्ट ,राखाडी पँट घातलेला एक माणूस चालत आला हेच अमित असावेत दोघा भावात कमालीच साम्य होतं ते आमच्या समोर येऊन बसले .

"  मीच अमित पटवर्धन आपण "

" आम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव आहोत रतन साहेबांच्या केसमधे आता आम्हीही काम करतोय "प्रदीप म्हणाला .

" अच्छा म्हणजे मानकेंनी हात टेकले वाटतं " अमितनी कुत्सीतपणे विचारलं .

" नाही नाही तस काही नाहीये त्यांच्या तपास चालूच आहे आम्ही आमच्या पद्धतीने तपास करू पाहतोय " मी म्हणालो .

" तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते " प्रदीप म्हणाला .

" मी तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यावी ही तुमची अपेक्षा का ?? " अमित आडमुठेपणाने म्हणाले यांची चौकशी करायला थोडा वेगळा मार्ग वापरावा लागणार होता .

" ठीक आहे नका देऊ असही मानके साहेब तुमच्याकडेच संशयाने पाहत आहेत आम्हाला वाटल होत तुम्ही निर्दोष असाल म्हणून इथे चौकशीसाठी आलो तुमची तयारी नसेल तर राहू दे " म्हणत मी उठलो .

" थांबा . . . .बसा बोलू " ते म्हणालो माझा बाण अगदी निशाण्यावर लागला त्यांचा बोलण्यातला पवित्रा बदलला .नोकराला आमच्यासाठी चहा आणायला पाठवलं 

" रतन साहेब आणि तुमच्यात कशावरून भांडण होतं ?? " प्रदीपने सुरुवात केली .

" अहो भांडण कोणाच्या घरात नसतात प्रत्येकाच्या असतात " 

" हो पण त्यामुळे कोणी बेपत्ता नाही होत " मी म्हणालो .

" दादाच्या बेपत्ता होण्यात माझा काही हात नाही " ते माझ्याकडे पाहत बोलले .

" तुम्ही त्या दिवशी कुठे होतात जेव्हा हे सर्व घडलं ?? "  प्रदीपने विचारलं .

" मी माझ्या ऑफिसमधेच होतो त्या दिवशी अर्जँट मीटिंग ठरली म्हणून निघायला उशीर झाला " 

" तुम्ही भांडणाच कारण नाही सांगितलत " मी म्हणालो .

इतक्यात त्यांचा नोकर चहा घेऊन आला .चहा बनवून निघून गेला मी आणि प्रदीपने कप उचलले अमित सोफ्यावर मागे टेकले होते हाताची घडी घालून बोलू लागले .

" हा बिजनेस आमच्या वडिलांनी उभारला होता त्यांच्या नंतर दादाला सर्व प्रॉपर्टी वारसा दिला गेला हा बिजनेस वाढवण्यात जेवढी दादाची मेहनत आहे तेवढीच माझीही जेव्हा वाटणी झाली तेव्हा प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा मला हवा होता पण त्याने तस नाही केल म्हणून वाद होता आमच्यात "

" त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत तुम्हाला काय वाटत " मी विचारलं माझ्या या प्रश्नावर काही वेळ ते विचार करून मग बोलू लागले .

" पोलीसांना वाटतंय की त्याच अपहरण झालय माझ मत विचाराल तर तो जिवंत असण्याबद्दलच मला संशय आहे " 

" अस समजण्यामागच कारण " प्रदीपने विचारलं .

" घरात जेव्हा आपल्या माणसांच्या रूपात शत्रु राहत असतील तर अजून काय होणार ? सुनीता आमच्या अात्याची मुलगी आत्याने पळून जाऊन लग्न केल त्यामुळे आजोबांनी तिच्याशी संबध तोडून टाकले बाबांना वाटत होत की आत्या जिथे असेल तिथे सुखी असेल पण ती स्वत:चा संसार नाही टिकवू शकली तोपर्यंत आजोबाही वारले मग बाबांनीच तिची जवाबदारी उचलली तिला आमच्या प्रॉपर्टीत हिस्सा हवा होता तिच्यामुळे आजोबा दुखावले गेले होते म्हणून बाबांनी तिच्या नावे काही नाही ठेवल म्हणून सुनीता आधीपासूनच आमचा तिरस्कार करायची इतकी की एकाच घरात राहून आमच्याशी बोलायचीही नाही नंतर ती पुण्याला शिकायला गेली सगळ ठीक चालू होत चार वर्षापूर्वी वहिनी म्हणजे दादाची पहिली पत्नी वारली दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे दादाच कोल्हापूरला येण जाण वाढलं होत एके दिवशी तो तिला घेऊन आला ती त्याला कुठे भेटली त्याच्याशी ओळख कशी झाली मला माहीत नाही

आपण ही कथा आतापर्यंत जास्तीच जास्त पाहिलीच असेल आणि आशा आहे आपल्याला ही आवडली असेल . या कथेत पुढे काय होत हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला संपूर्ण कथा वाचावी लागेल .पूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा amazon kindle वेबसाईटवर जाऊन “प्रतिबिंब “ किंवा writer abhi टाईप करून पूर्ण पुस्तक प्राप्त करा

 

https://www.amazon.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A2%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-Marathi-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%80-ebook/dp/B086R4CGP1/ref=sr_1_2?dchild=1&keywords=abhishek+dalvi&qid=1586019155&s=digital-text&sr=1-2

 

 

 

 

 

... मात ...

हरिहरपूर गावात आज फार उत्साहाचं वातवरण होतं . गावातल्या पहिल्या वहिल्या शाळेच आज उदघाटन होत .गाड्यांची सवय नसलेल्या मळक्या वाटेवरून एक आलिशान मोटार धुराळा उडवत चालली होती . ड्राइवरच्या बाजूला पन्नास पंचावन्नकडे झुकलेली व्यक्ति बसली होती .कोपरापर्यंत बाह्या दुमडलेला करड्या रंगाचा कुर्ता ,साधारण तशाच रंगाच धोतर ,डोक्यावर टोपी असा काहीसा कारकूनी ढंगाचा पेहेराव ,कानावर काळेपांढरे केस ,डोळ्यांवर गोल सोनेरी फ्रेमचा चश्मा त्यातून डोकावणारी लोभी, बेरकी नजर त्याच्या लालसेची जाणीव करून देत होती .गाडीत मागे एेटीत एक व्यक्ति बसली होती .गाडी जसजशी पुढे जात होती तसतशी आसपासची लोक एकमेकांना खूणवून त्याकडे लक्ष वेधून घेत होते आणि आतल्या व्यक्तीकडे लक्ष जाताच हात जोडून उभे राहत होते . पण या नमस्कारात आदर कमी आणि भीती जास्त होती .आतल्या व्यक्तिकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता ती अगदी आरामात बसली होती .या लोकांकडून मिळणारा मान हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे अशी गुर्मी त्याच्या डोळ्यांत दिसत होती .आता बऱ्याच लोकांच्या गलबलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला काही अंतर पुढे जाऊन गाडी थांबली .

गाडीतुन कोकणी वहाणा घातलेले दोन पाय जमिनीवर स्थिरावले त्या पाठोपाठ बारीक नक्षीकाम असलेली लाकडी काठी जमिनीवर आपटली .अंगठ्यांनी भरलेल्या बोटांनी काठीवरची चांदीची मूठ घट्ट पकडली होती . सोनेरी काठ असलेले पांढरे शुभ्र धोतर ,गुढग्यापर्यंत रेशमी अंगरखा ,छातीवर रूळणारी वाघनखं, डोक्यावर दिमाखात स्थिरावलेला फेटा अस साठ पासष्ठीच व्यक्तिमत्व सर्वांसमोर उभं होत .त्यांना पाहताच लोकांचा गलबलाट बंद झाला त्या व्यक्तीची घमेँडी नजर प्रत्येकवरून फिरत होती . तिने हाताच्या एका बोटाने आपल्या भरघोस सफेद मिश्यांना उभारी दिली आणि चालू लागली त्या पाठोपाठ त्याचा कारकूनही चालू लागला .आजुबाजूला शांतता पसरली होती .दूरवर कुठेतरी एखाद पाखरू फडफडत उडून गेल त्याचाही स्पष्ट आवाज ऐकू येत होता .समोरून पाच सहा लोक आणि सर्वात पुढे एक सफ़ेदशर्ट आणि काळी पँट घातलेला एक इसम हातात हार घेऊन त्यांच्या दिशेने येऊ लागला .जवळ येताच त्याने त्या व्यक्तीच्या गळ्यात हार घालून पाया पडला .समोर दहा ते बारा खोल्या असलेली नवी कोरी बैठी इमारत दिसत होती .काही अंतरावरच भलीमोठी लाल रिबिन लावलेला गेट दिसत होता .गेटच्या कमानीवर सफेद पार्श्वभूमीवर काळ्या अक्षरात " जनार्दन शेळके प्राथमिक विद्यालय " हे नाव कोरल होतं ते पाहून त्या व्यक्तीची काठीवरची मूठ काहीशी घट्ट झाली आणि काठी जमिनीवर रागाने आपटली गेली हे कोणाच्या लक्षात आलं नाही अस नाही पण कोणी जाणवू दिल नाही .

" अाप्पासाहेब त्यांना उशीर होईल अस दिसतय तो पर्यंत तुम्ही बसून घ्याना " तो शर्ट पँट घातलेला इसम समोरच्या लाकडी खुर्चीकडे अंगुलीनिर्देश करत म्हणाला त्या बरोबर अाप्पासाहेब त्या खुर्चीकडे चालू लागले .

   प्रतापराव खोत उर्फ अाप्पा गावचे सावकार आणि एकमेव श्रीमंत व्यक्ति गावातली अशी क्वचित कुटुंब असतील ज्यांची जमीन यांच्याकडे गहाण नसेल कारण गरज नसतानाही  कर्ज घ्याव अशी परिस्थिती कोणावरही निर्माण करण्यात प्रतापरावांचा हातखंड होता . अर्थात त्यांच्या या नीचपणा विषयी फार कमी लोकांना माहिती होती . कारण त्यांच्या डाव्या हाताची खबर उजव्या हाताला लागत नसे त्यांच्या सर्वात जवळच्या कारकुनालाही त्यांच्या बद्दल सर्व माहिती असेल की नाही ही शंका होती .कोणी आपल्या पुढे गेलेल त्यांना कधीच सहन होणार नव्हत तसा कोणी आजपर्यंत प्रयत्नही केला नव्हता त्यांचा अहंकार त्यांच्यासाठी सर्व होता त्याला ज्याने कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला होता तो आता या जगात नव्हता .पण काही वर्षापासून अशा काही गोष्टी घडत होत्या ज्याने त्यांना अस्वस्थ केल होत .एक व्यक्ति त्यांच्या मनात सारखी सलत होती .

 ते खुर्चीवर स्थानापन्न झाले पायावर पाय घेतला इतक्यात मघाशी थांबलेला तो लोकांचा गलका पुन्हा सुरू झाला .अजून दोन गाड्या पाठोपाठ तिथे आल्या होत्या त्या त्यातून एक पन्नास पंचावन्नीचा  पांढराशुभ्र पायघोळ सदरा तसेच धोतर , डोक्यावर केसरी फेटा ,काळसर सफेद भरघोस मिश्या, गळ्यात सोन्याची चैन,धष्टपुष्ट शरीरयष्टी अशा रूबाबदार अवतारात एक ग्रुहस्थ उतरले . सगळे गावकरी त्यांच्या आसपास जमू लागले कोणी पाया पडत होत तर कुणी हार घालत होतं तो सर्वाना योग्य तो प्रतिसाद देत पुढे चालत येत होता त्या पाठोपाठ त्याचं कुटुंबही येत होतं .त्यांची पत्नी ,तीन हट्टेकट्टे मुलगे ,त्यांच्या बायका प्रत्येकीच्या अंगावर असलेले ते दागिने पाहून प्रतापरावांच्याच्या चेहऱ्यावर ईर्ष्येचे भाव उमटले ,कपाळावर आठी पडली ती व्यक्ति गर्दीतून वाट काढत प्रतापरावांसमोर प्रणाम करून उभी राहीली .प्रतापरावांनी प्रतिसाद म्हणून बसल्याबसल्याच हात जोडले त्या ग्रूहस्थाने डोळ्यांनीच नातवाला इशारा केला त्या सरशी दोन्ही नातवांनी प्रतापरावांच्या पायाला हात लावून नमस्कार केला त्यांनीही हात पुढे करून आशीर्वाद दिल्यासारख केल .

" काय सदाशिव . . .राव ही काय येळ झाली का यायची हं ?? " बाजूलाच उभ्या असलेल्या प्रतापरावांच्याच्या कारकून दत्तूने विचारल .

" माफ करा पर ह्या पोराटोरांची तयारी म्हंजी . . . . .म्हणून जरा उशीर झाला " सदाशिव बोलले .

" काय सदा तूझा मानमरातब पाह्यला बोलावलंयस व्हय आमाला इथं" प्रतापरावांनी उसनं हसू ओठांवर आणत खोचकपणे विचारलं .

" अहो अास काय बोलताया . .नवीन शाळा उघडतोय तर उदघाटनाचा मान तुमचाच नाही का " सदाशिव अगदी अदबीने बोलले .

" आरे पण आमचा मान राहिला बाजूलाच इथे लोक तुलाच घेऊन नाचाया लागलीत की " प्रतापराव हसरा चेहरा ठेऊनच बोलत होते पण त्यांच मन आसपासच्या काही लोकांना चांगलच कळत होतं विशेष करून मुख्याध्यापकांना . या आधीही शाळेच्या मागणीसाठी त्यांची प्रतापरावांशी अनेकदा भेट घेतली होती पण त्यांनी असच गोडगोड बोलून त्यांना उडवून लावल होतं .

" अावो त्यांची मायाच ती त्याला आपण तरी काय करणार " सदाशिवनी तितक्याच शांततेत उत्तर दिल .

" कार्यक्रमाला उशीर होतोय जर आपली परवानगी असेल तर . . . . " मुख्याध्यापक मधेच आठवण करून देत बोलले .

  प्रतापरावांच्या बोलण्याचा रोख त्यांच्या पुरेपूर लक्षात आला होता त्यांनी विषय आणि ताणू नये म्हणून त्यांना मधे बोलाव लागलं .

" डोळेंना लईच घाई झालेली दिसतेय उदघाटनाची  " प्रतापराव मुख्याध्यापकांकडे थोड्या खाऊ की गिळू नजरेने पाहत बोलले त्यांच्यात प्रतापरावांच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत नव्हती त्यांनी आपली नजर खाली झूकवली .

" चला . . .उरकून घेऊ कार्यक्रम " म्हणत प्रतापराव उठून गेटकडे  निघाले .

त्या पाठोपाठ इतर मंडळीही चालू लागली .उदघाटनाची रीबीन कापली गेली त्या पाठोपाठ टाळ्यांचा कडकडाट झाला . सदाशिव शेळकेंच्या नावाचा जयघोष सुरू झाला आतून नऊवारीतील दोन स्त्रिया औक्षणाच ताट घेऊन आल्या सदाशिव आणि प्रतापरावांच औक्षण केल गेल त्या दोघांनी आत प्रवेश केला .शाळेसाठी जागा चांगली निवडली होती बांधकामही चांगल झाल होत .रांगेत सलग बारा वर्ग पसरले होते,हवा खेळती राहण्यासाठी समोरा समोर खिडक्या होत्या ,वर्गाँच्या भिंतीवर महापुरुषांची चित्रे रेखाटली होती ,सुविचार लिहलेले होते, मैदानातली उरलेल्या जागेत फूलझाडांची रोपटी लावली होती , वातावरण अगदी प्रसन्न होतं .

   प्रतापराव आणि सदाशिवराव ऑफिसमधे येऊन बसले इतर मंडळी शाळा पाहण्यात मग्न होते .दोघांसाठी चहा मागवला गेला .प्रतापरावांच सहज लक्ष गेल . एक शिकारी जातीचा कुत्रा सदाशिवरावांच्या गाडीतुन उतरल्या पासून त्यांच्या पायापाशी घुटमळत होता .

" कुत्र्याला लईच जीव लावलला दिसतूया " प्रतापरावांनी कुत्र्याच्या रोखाने पाहत प्रश्न केला .

" तुम्ही याला ओळखलेला दिसत न्हाई  "

" म्हंजी ?? " 

"

1 2 3 4 5 6 7
Go to page:

Free e-book «प्रतिबिंब, अभिषेक दळवी [free novel reading sites .TXT] 📗» - read online now

Comments (0)

There are no comments yet. You can be the first!
Add a comment