प्रतिबिंब, अभिषेक दळवी [free novel reading sites .TXT] 📗
- Author: अभिषेक दळवी
Book online «प्रतिबिंब, अभिषेक दळवी [free novel reading sites .TXT] 📗». Author अभिषेक दळवी
आम्ही दोघे पूजेला बसलो .भटजीही छोट्याश्या पाटावर आपला अवजड देह सावरत कसेबसे बसले .पूजेला सुरुवात झाली .जसजस मंत्रपठण सुरू झालं तस तशी बाबांची कानशिलं ताठ झाली ते लक्ष देऊन ऐकू लागले म्हणजे बाबा तसे देवभोळे वैगरे नव्हते पण मध्यंतरी अनुभवच असा आला होता की बाबांचाही इलाज नव्हता .साधारण दोन वर्षापुर्वीची गोष्ट आम्ही गणपतीसाठी गावाला गेलेलो थोरले आणि धाकटे काका गावालाच असतात . आम्हीही दोन दिवसांपूर्वी जाऊन सर्व तयारी वैगरे केली गणेशचतुर्थीच्या दिवशी सकाळीच सकाळी जाऊन मूर्तीही आणली तेव्हाच दादाला ऑफिसमधून कॉल येऊ लागले तसा तो परत जाण्याची तयारी करू लागला पण मोठ्या काकांनी अडवलं प्रतिष्ठापणा केल्याशिवाय जायचं नाही म्हणून .आता त्यांच्या समोर बाबांनी तोंडातून कधी ब्र काढला नाही तर आम्ही काय बोलणार .प्रतिष्ठापना झाल्या शिवाय त्याला काही निघता येणार नव्हतं आमच्या गावात शेकडो घरं आणि भटजी मोजकेचं त्यात आमचे कुलकर्णी काका ठरलेले सगळ्या घरांची प्रतिष्ठापना करून आमच्या घरी येई पर्यंत दुपार झाली असती म्हणून मी आणि दादा अर्जँट कोणता भटजी भेटतो का हे पाहायला निघालो आणि एक पंचवीस सव्वीस वर्षाचा कूडमुड्या भटजी शोधूनही आणला जस जशी पूजा सुरू झाली आणि त्यांने मंत्रपठण सुरू केल तसतसे आमच्या मोठ्या काकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले .म्हणजे आपण एखाद्या प्रश्नाच उत्तर पूर्ण पाठ करून परीक्षेला जाव पेपरच्या आधी सहज खात्री करण्यासाठी मित्राला त्याच प्रश्नाच उत्तर विचाराव आणि त्यांने कोणत तरी भलतच उत्तर सांगाव तेव्हा आपल्या चेहऱ्यावर जसे भाव असतात तसे काहीसे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते ते पाहून काही तरी गडबड आहे हे माझ्या लक्षात आलं .आमच्या मोठ्या काकांचा पोथीपुराण ,वेदपठण यांचा गाढा अभ्यास होता क्षत्रियकुळात जन्मले म्हणून जर ब्राम्हण कुळात जन्मले असते तर गावातल्या बाकीच्या भटजींवर उपासमारीची वेळ आली असती हे मी ठामपणे सांगू शकतो त्यांच्या चरफडण्याच कारण नंतर आम्हाला कळलं .आम्ही भटजी आणला होता प्रतिष्ठापनेसाठी पण उत्तरपूजेचे मंत्र म्हणून गेला .काका तेव्हा काही नाही बोलले पण नंतर दिवसभर त्यांची पीरपीर सुरू होती ." भटाला बोलवलेल कशाला आणि काय बोलून गेला उद्या बारशाला बोलवाल आणि तेराव्याचे मंत्र बोलून जाईल " तेव्हापासून बाबांनी कोणता नवीन भटजी आणायचा असेल तर त्याचे काही केस तरी पिकलेले असावेत ही प्राथमिक अट आम्हाला घालून दिली म्हणून मी पुन्हा एकदा त्या भटजींकडे निरखून पाहिलं त्यांच्या मिश्यांचे काही केस सफेद आहे हे पाहून हायस वाटलं .
पूजा चांगली पार पडली सगळ अाटपेपर्यंत साडेनऊ दहा वाजले .आई बाबा बाजूच्या बेडरूममधे झोपायला गेले दादाने आपली सोय हॉलमधे करून घेतली मी बेडरूममधे आलो तन्वी अंगावरचे दागिने उतरवून लॉकरमधे ठेवत होती .दिवस भराच्या धावपळीनंतरही अगदी सकाळ सारखीच दिसत होती .
आमचं आठ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होत तशी आमची ओळख जुनीचं अगदी कॉलेजपासूनची तन्वी पुण्याची मी मुंबईचा पण त्या वेळी बाबा दिल्लीला होते म्हणून आईने दिल्लीला जाऊन राहण्यापेक्षा पुण्याला मामाकडे येऊन राहणं पसंद केल माझ कॉलेजही इथेच सुरू झालं मी बी .एस्सी ला आणि तन्वी बी .कॉमला होती त्यावेळीही ती फार सुंदर होती मला जाम आवडायची पण प्रॉब्लेम असा होता की ती थोडी काकूबाई टाईपची मुलगी होती आणि माझी चॉइस वेगळी होती .लेक्चर बंक करून फिरायला जाणाऱ्या ,बाईकवर बिनधास्त मागे बसून भटकणाऱ्या ,मस्तपैकी गळ्यात गळे घालून फिरण्याऱ्या मुलींकडे माझा कल होता त्यामुळे तन्वी मला आवडत असूनही मी तिला कधी विचारलं नाही .डिग्री झाल्यावर ती एम .कॉम ला गेली मी काही एम .एस्सी ला जायच्या फंदात पडलो नाही वरील वर्णनावरून माझी बौद्धिकक्षमता लक्षात आलीच असेल मी काही ढं वैगरे नव्हतो पण हुशारही नव्हतो म्हणून सरळ मुंबईला येऊन नोकरी धरली त्यानंतर तिची कधी भेट झाली नाही असंही जेसीका माझ्या आयुष्यात होतीच तिच्या नंतर प्रियंका आणि भावनाही येऊन गेली त्यामुळे मला तन्वीचा पूर्ण विसर पडला . एके मी मित्रांबरोबर कॉफीशॉपमधे बसलेलो होतो तेव्हा ही तिच्या मैत्रिणीं बरोबर तिथे आली ती तन्वी आहे हे मी पाहता क्षणीच ओळखलं त्या दिवशी तिच्याशी बोलायची माझी काही हिम्मत झाली नाही .नंतर सलग दोन दिवस ती भेटेल या अाशेवर मी त्याच टाइमला तिथे जाऊन बसायचो पण नंतर काही ती दिसली नाही तिसऱ्या दिवशी संध्याकाळी असाच तिथे अर्धा तास बसून होतो तिथून जरा उशीराच निघालो तेव्हा समोरच्या बँकेतून ती बाहेर येताना दिसली तिच्या गळ्यात बँकेच आयडी होत त्यावरून ती तिथेच काम करत होती हे स्पष्ट झालं .मी रस्ता क्रॉस करून तिच्याशी बोलायला जाई पर्यंत ती रिक्षा पकडून निघून गेली . मी ही सगळी परिस्थिती माझ्या एका मित्राला सांगितली ती इथे कशी , कुठे राहते , सर्वात महत्वाचं म्हणजे लग्न झालयं का ? हे कळण गरजेच होत याची माहिती तो देईल अस त्यांने आश्वासन दिलं .मग बँकेचा वॉचमन आणखी एका दोघांशी गोडगोड बोलून त्यांने तिची माहिती मिळवली अर्थात त्यांने अशा गोष्टीत फारच प्राविण्य मिळवलं होतं . त्यांने मला सांगितलं ती एम .कॉम करून चार महिन्यांपूर्वी इथे रुजू झालीय सध्या तिच्या काकांकडे राहतेय आणि महत्वाचं म्हणजे तिच्या काकाने तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केलीय . ही माहिती त्याने मला दिली पण त्याच्या बदल्यात मला त्याला मनचाऊ सूप, एक चिकन तंदूरी , एक चिकन कबाब ,एक कलेजी फ्राय , एक चिकन टीक्का मसाला पाच रोट्या आणि हाफ बिर्याणी द्यावी लागली .एवढ सगळ खाऊनही त्याचा आत्मा शांत झाला नाही त्यांने रमसाठी माझ्याकडे पैसे मागितले मी नाही देत म्हटल्यावर " काकू समोर तूझ भांड फोडेन " अशी त्यांने मला धमकी दिली .तो माझा लहानपणी पासूनचा मित्र होता त्यात गोरागोमटा ,गुबगुबीत ,डोळ्यांवर भलामोठा चश्मा आणि माझ्या आई समोर चेहऱ्यावर साळसूदपणाचा भाव आणणारा असल्याने आईच्या सभ्य मुलांच्या व्याख्येत तो बसत होता आणि मी तर लहानपणी पासून आईच्या मते वात्रट कारटा होतो . त्यामुळे त्याच्या सांगण्यावर आईने लगेच विश्वास ठेवला असता म्हणून मग नाईलाजाने त्याच्या हातावर पैसे टेकवले .
तन्वीच्या काकाने तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केलीय हे माझ्यासाठी काळजीच कारण होतं .मला लवकर हालचाल करावी लागणार होती .एकेकाळी जिच्याकडे मी काकूबाई म्हणून दुर्लक्ष केल होतं तीच्या साठीच मी आता इतका कासावीस झालो होतो एखादी गोष्ट जेव्हा दूर जाते तेव्हाच ती आपल्याला हवी हवीशी वाटते हे काही खोट नाही तसच काहीसं माझ झालं असावं .मी दुसऱ्या दिवशी लगेच ती काम करत असलेल्या बँकेत अकाउंट उघडल नंतर काहीना काही काम काढून तिथे जाऊ लागलो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करू लागलो तिने मला ओळखलं असाव कॉलेजमधे तिच्याकडे चोरून पाहताना तिने मला पाहिल होतं .माझ अस उपटसुंभासारख काहीही फालतु काम काढून बँकेत येण ,तिच्याशी बोलायचा प्रयत्न करण यावरुन तीला शंका आली असावी .काही दिवसांनी मी तिला विचारलं तेव्हा विचार करायला थोडा वेळ द्या अस बोलून तब्बल सहा दिवस घेतले . ज्या प्रमाणे विमानात बसलेल्या लाजऱ्या बुजऱ्या भारतीय संस्कृतीत वाढलेल्या स्त्रीला एअरहोस्टेसने चहा,कॉफी का व्हिस्की अस विचाराव आणि तिने आपल्याकडे कोणाच लक्ष नाही पाहून हळूच व्हिस्की अस म्हणाव तशी लाजत ती मला " हो " म्हणालीमग सुरू झाली आमची प्रेमकहानी .
दर शनिवारी आम्ही हातात हात घालून मुंबई दर्शन करू लागलो .यातच एक दीड महीना गेला असच एके दिवशी दादर चौपाटीवर फिरताना तिच्या काकांच्या मित्राने आम्हाला पाहिलं त्यावेळी तिच्या काकाचा मित्र तिथे काय करत होता हा प्रश्न माझ्यासाठी अजूनही अनुत्तरित आहे .ह्या नंतर तिच्या घरी सगळ कळल .तीच्या घरचे सहकुटुंब सह परिवार मुंबईला आले मग माझ्या घरातही सर्व सांगव लागलं आमच्या दोघांचेही आईवडील "आता पुढे काय "हा गहन प्रश्न घेऊन चर्चेला बसले आमच्या दोघांत नकार देण्यासारख काही नव्हतचं त्यामुळे दोन्हीकडून संमती मिळाली आणि लग्न पार पडलं लग्नानंतर आठ महिन्यांनी माझ प्रमोशन झालं आणि माझी बदली पुण्याला झाली .पुण्याला बदली झाली तेव्हा थोडा निराश झालो होतो कारण मला आणि तन्वीलाच तिथे राहायला जाव लागणार होतं .बाबांच अख्ख आयुष्य मुंबईत गेल्याने ते काही तिथे राहायला येणार नव्हते त्यामुळे आईही येणार नव्हती . पहिल्यांदा आईपासून इतका दूर जाऊ लागलो त्यामुळे थोड उदास वाटत होत पण या बातमीने आमची अर्धांगीनी अगदी आनंदाने नाचू लागली कारण सोप होत .पुण्याला बदली झाली की तिला वरचेवर माहेरी जाता येणार होतं या बायका माहेर म्हटलं की अशा काय हुरळून जातात की काही विचारायला नको तिला तिचे आई बाबा राहतात त्या किंवा तिच्या आसपासच्या बिल्डिंगमधे घर हव होतं . म्हणजे सकाळी हिला ब्रेकफास्ट बनवायचा त्रास नाही तो सासूबाईच पुरवणार होत्या, संध्याकाळी ऑफिसमधून उशीर झाला तर जेवणाची सोयही तिथूनच झाली असती ,हिने कोणता नवीन पदार्थ बनवला तर ही डबा भरून तिकडे पोहचवनार होती मग तिची आई तोंड भरून तीच कौतुक करणार होती अशी दिवास्वप्न ती पाहू लागली होती . मला आधुनिक पद्धतीचा ,अत्यंत हवेशीर असा फ्लॅट हवा होता माझ्या सासऱ्यांच्या घराच्या आसपास असलेल्या सगळ्या बिल्डिंग जुन्या पद्धतीच्या होत्या तिथे असा फ्लॅट मिळणं शक्य नव्हत तिच्या घरापासून अर्धा पाऊण किलोमीटरवर एक फ्लॅट आहे हे मला ब्रोकरने सांगितल जेव्हा तन्वीला मी हे सांगितल तेव्हा तिचा चेहरा पाहून मला पोटातल्या पोटात जाम हसायला येत होतं . तो फ्लॅट मी फायनल केला सामान शिफ्ट केल .
तिथे येऊन काही वेळ जातो न जातो तोच तिने माझ्याशी पहिलं भांडण केल .आमच्या बेडरूममधे बेडसमोर मी तिचा फोटो लावला तिने तो काढून तिच्या आईने दिलेल्या कोणत्यातरी साधुबाबाचा फोटो लावला मी तो काढून पुन्हा तिचाच फोटो लावला त्यावर ती भडकली . आता कोणताही पुरुषाला सकाळीच सकाळी उठल्यावर आपल्या बायकोचाच चेहरा बघायला आवडेल ना की दाढी जटा वाढवलेल्या , कपाळभर भस्म फासलेल्या , बेडकासारखे डोळे असलेल्या कोणत्या अवली बाबाचा पण हे तिला कोण सांगणार . . .ती रुसून बसली . हा तो जर हिने आणला असता आणि मी लावायला नकार दिला असता तर ती रागावली नसती पण हा फोटो तिच्या आईने आणला होता ना .ह्या बायकांच्या मते समस्त नवरे मंडळी ही त्यांच्या माहेरच्यांचा अपमान करण्याची संधीच शोधत असतात तन्वीही त्याला अपवाद नव्हती .मी तिच्या बाबांच्या घराच्या आसपास घर घेतलं नाही याचा तिने वचपा काढण्याचा प्रयत्न केला असावा अशीही शंका माझ्या मनात डोकावून गेली .ते काहीही असो तिने अबोला धरला होता .मी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला शेवटी घरातलं सगळ फर्नीचर ती तिच्या चॉइसने घेणार त्यात मी लुड्बुड करायची नाही या अटीवर तिने तहाचा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला आणि तो मान्य करण्यावाचून माझ्याकडे पर्याय नव्हता .आजच्या पूजेच्या धावपळीनंतर माझा उद्याचा दिनक्रमही ठरला .सकाळी
Comments (0)